द्वेष पसरविणाऱ्यांवर `मनसे` विरोधात कारवाई करा!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
द्वेष पसरविणाऱ्यांवर `मनसे` विरोधात कारवाई करा!
CPM leader Dr D. L. Karad & Commissioner Deepak PandeSarkarnama

नाशिक : राज्यातील धार्मिक स्थळांवर (Religiou place)अनधिकृतरीत्या भोंगे (Loud speakers) लावल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाकडून विशिष्ट भूमिका हाती घेण्यात आली आहे. यामुळे समाजामध्ये जातीय तेढ (Communal tension) निर्माण होणार असल्याने तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (CPM) पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत तसे निवेदनदेखील देण्यात आले.

CPM leader Dr D. L. Karad & Commissioner Deepak Pande
गडकरी साहेब, टोल नाक्यांचा गुंता सोडवा, जनतेचे पैसे वाचवा!

सध्या राज्यात धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंग्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, राजकीय पक्षाच्या या भूमिकेमुळे समाजात जातीय तेढ व द्वेष निर्माण होणार आहे.

CPM leader Dr D. L. Karad & Commissioner Deepak Pande
दीपक पांडेचे उपक्रम नाशिकमध्ये पुढे सुरु राहणार!

त्यामुळे नाशिक शहराचे पोलिस आयुक्त म्हणून आपण शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घेण्याचा निर्णय योग्य आहे. यासह जर कोणी जातीय तेढ निर्माण केला तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी माकपातर्फे करण्यात आली.

याप्रसंगी सीटू केंद्रीय कमिटी उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सदस्य कॉ. सीताराम ठोंबरे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे उपस्थित होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.