दीपक पांडेंचा आधी नारायण राणेंशी आता राज ठाकरेंशी पंगा!

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे अधिकाराचा पुरेपुर वापर करतात.
CP Deepak Pande, Raj Thakre & Centre minister Narayan Rane
CP Deepak Pande, Raj Thakre & Centre minister Narayan RaneSarkarnama

नाशिक : एक पोलिस आयुक्त (Commissioner of Police) ठरवले तर काय करू शकतो, अधिकारांचा वापर कसा करु शकतो याचे उदाहरण म्हणून दीपक पांडे (Deepak Pande) शहरात चर्चेत आहेत. या आधी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता त्यांनी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आनणाऱ्या मशिदीवरील भोंगे प्रकरणात राज ठाकरे (Raj Thakre) यांची हवाच काढून घेतल्याने चर्चा होत आहे.

CP Deepak Pande, Raj Thakre & Centre minister Narayan Rane
राज ठाकरे फसले; मशीदीवरील भोंगे उतरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच नाही!

पोलिस आयुक्त दीपक पांडे आज माध्यमांत चर्चेत आले. त्यांनी सध्या राज्यात चर्चेचा विषय असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य शासनाला ३ मे ही तारीख अल्टीमेटम म्हणून दिली होती. यावर श्री. ठाकरे सातत्याने वातावरण तापवत आहेत. रोज नव्हे तर तासा तासाला हा विषय नव्या बातम्यांना जन्म देत आहे. यावर काही तोडगा निघेल की गृह विभाग थेट कारवाई करतो याची उत्सुकता होती. अशातच काल मध्यारात्री पोलिस आयुक्त पांडे यांनी याबाबत आदेश काढला. नमाजच्या वेळेला मशीदीसमोर हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा म्हणायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घेऊनच म्हणावी लागेल. मशीदींपासून शंभर मीटर अंतरावर हा कार्यक्रम करावा लागेल. यांसह अतिशय मुद्देसुद व निकष निश्चित केलेला हा आंदेश मान्य नसेल तर खुशाल उच्च न्यायालयात जावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

CP Deepak Pande, Raj Thakre & Centre minister Narayan Rane
मशिदीजवळ भोंगे लावाल तर ४ महिने जेल अन् तडीपारी!

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संवैधानीक पदावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमानजनक उल्लेख केला होता. तेव्हा राज्यभर श्री. राणे यांच्यावर काय कारवाई होते याची उत्सुकता निर्माण झाली होती. यावेळी पोलिस आयुक्त पांडे यांनी श्री. राणे यांच्या विरोधात शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची तक्रार दाखल करीत श्री. राणे यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे राणे चांगलेच अडचणीत आले होते. शेवटी त्यांनी आपला जबाब ऑनलाईन नोंदवला.

यापूर्वी शहरात हेल्मेट सक्तीचा आग्रह धरीत त्यांनी विविध प्रयोग केले. विना हेल्मेट पंपावर इंधन देऊ नये. त्यासाठी पंपांवर पोलिसांची नेमणूक केली. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याने नागरिकांनी, राजकीय पक्षांनी भरपुर आदळ आपट केली, मात्र आयुक्त पांडे बधले नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे सध्या एैंशी टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरताना दिसतात. ऑनलाईन लॅाटरीबाबतचा महसूल बुडतो. त्यासाठी कायदा करण्याची सुचना करून त्याचा ड्राफ्ट तयार करून दिला होता. पोलिस चौक्यांना भेटी. असे विविध उपक्रम आयुक्त पांडे यांनी केल्याने ते चर्चेत आले होते. होर्डींग्जला मनाई करून शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी पावले टाकली. त्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची कोंडी झाली. या विषयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नोटीस दिली. राज ठाकरे, संजय राऊत, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक पदाधिकारी यांसह विविध नेत्यांना त्यांनी याबाबत सुचना केल्या होत्या.

मशिदीवरील भोंग्यांचे राजकारण पेटलेले असताना हा विषय बेफाम होण्याआधीच त्याला लगाम घालण्याचे काम नाशिकमधून आयुक्त पांडे यांनी केले. त्यांच्या या आदेशाने या विषयावर राजकारण करणाऱ्यांची चांगलीच गोची होऊ शकते. याबाबत राज ठाकरे काय प्रतिक्रीया देतात याची देखील उत्सुकता आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com