पुणे-मुंबईसोबतच नाशिकलाही कोरोनाचा अलर्ट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी मुकाबल्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू.
Covid spreading in Nashik City

Covid spreading in Nashik City

Sarkarnama

नाशिक : नाशिकला लागून असलेल्या मुंबई, पुण्यामध्ये (Pune) कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली. नाशिकला तीन दिवसांपासून कोरोना (Covid19) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे-मुंबईपाठोपाठ आता नाशिकमध्येही (Nashik) विविध स्तरांतून चिंता व्यक्त होत आहे.

<div class="paragraphs"><p>Covid spreading in Nashik City</p></div>
भाजपचा व्हीप नाकारणाऱ्या २९ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आजमितीस जिल्ह्यात ८३१ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी एकाच दिवसात २१६ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील १५१, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ३६, तर जिल्हाबाह्य २९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार ७५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला आहे. पॉझिटिव्हीटी दरही ३.११ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून नाशिकमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर नागरिक ये- जा करत असतात. अशा पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता ‘नो मास्क, नो एन्ट्री’, रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी अशा निर्बंधांसह राजकीय, सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी, नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे.

<div class="paragraphs"><p>Covid spreading in Nashik City</p></div>
एका पत्राने वाचवले महापालिकेचे १७४ कोटी रुपये?

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. ऑक्सिजनसाठी लोकांनी रस्त्यावर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. हे पाहता आता महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. रोज चार हजार टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजननिर्मिती करणारे २३ प्रकल्प उभारले आहेत. त्यातून २३ टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी २४६ टन क्षमतेच्या १९ टाक्या आहेत. १३० टन साठ्याचे सात हजार २७१ ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.

तीन हजार ३०० बेडची व्यवस्था

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शहरात तीन हजार ३०० बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन हजार २०० खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास २५० खाटा वाढविण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५०, ठक्कर डोम ३२५, संभाजी स्टेडियम येथे २८० खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये १८० खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर ५०० खाटा, मेरी कोविड सेंटर २०० खाटा, अंबड सेंटर ३०० खाटा, सातपूर मायको रुग्णालय ५०, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल ६० ऑक्सिजन खाटा आहेत.

--

मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजारांहून अधिक झाली आहे. नवीन रुग्णांपैकी ५०३ रुग्णालयात दाखल झाले, तर ५६ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार समजण्यासाठी हे चित्र बोलके आहे. त्यामुळे कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असून, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लशीचे कवच प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आहे. आता वेळ कमी आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in