धुळे महापालिकेत दोन कोटींचा कोरोना लस घोटाळा?

प्रमाणपत्र घोटाळाप्रकरणी महापालिकेच्या प्रवेशद्वारात सोमवारी शिवसेनेचे आंदोलन झाले.
Shivsena leaders agitation in Dhule

Shivsena leaders agitation in Dhule

Sarkarnama

धुळे : कोरोना प्रतिबंधक लस (Covid vaccination) घेतल्याच्या नावाखाली बनावट प्रमाणपत्र वाटपात महापालिकेत (Dhule corporation) दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने (Shivsena) केला. हा प्रकार सत्ताधारी व प्रशासनाच्या संगनमताशिवाय शक्य नाही. स्वयंघोषित एक पुढारी या घोटाळ्याचा सूत्रधार आहे, असा दावा करण्यात आला.

दरम्यान हा घोटाळा उजेडात आल्यानंतर दबावतंत्रातून कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविले जात आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सूत्रधाराला निलंबित करावे, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील शिवसेनेने केली.

<div class="paragraphs"><p>Shivsena leaders agitation in Dhule</p></div>
...आता राज्यात हमीभावाच्या कायद्यासाठी लढा होणार!

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित म्हणाले, घोटाळेबहाद्दरांनी ५० हजार कोरोना प्रतिबंधक लस काळ्या बाजारात विकल्याचा संशयही शिवसेनेने व्यक्त केला आहे. पाचशेच्या नकली नोटांच्या माळा घालत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. त्यांनी घोषणाबाजीतून परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविले व पाच जणांच्या शिष्टमंडळाला निवेदन देण्यास परवानगी दिली.

<div class="paragraphs"><p>Shivsena leaders agitation in Dhule</p></div>
शिवसेनेच्या प्रचार, प्रसाराची सुत्रे आता महिलांकडे!

शिवसेनेचे निवेदन

महापालिका आरोग्य विभागाने लस न देता सरासरी प्रत्येकी ४०० ते ५०० रुपयांची चिरीमिरी घेऊन दोन डोसद्वारे लसीकरण झाल्याची ८ ते १० हजार प्रमाणपत्रे वाटप केली आहेत. हा गंभीर प्रकार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यात कोठेही जा-येसाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे. यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार केला आहे. या शासन आदेशाची अंमलबजावणी करणे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित विभागाची जबाबदारी आहे. मात्र, येथील महापालिकेने जबाबदारी धाब्यावर बसवत बोगस प्रमाणपत्र विक्रीचा उद्योग सुरू केला.

एसव्हीके नामक लसीकरण केंद्रावर एका दिवसांत तब्बल दोन हजार ४०० प्रमाणपत्रे देण्याचा विक्रम घोटाळेबहाद्दरांनी केला आहे. सुटीच्या दिवशी लसीकरण केंद्र बंद असतानाही महापालिकेच्या त्या महाभागांनी प्रमाणपत्र वाटपाचा पराक्रम केला आहे. लसीकरण झालेले नसताना प्रमाणपत्र दिल्यामुळे लशीच्या बाटल्या काळ्या बाजारात विकली जाण्याची शक्यता आहे. अशा सर्व प्रकारातून दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हा घोटाळा वरिष्ठांच्या आदेशाने केल्याचे लेखी पत्र काही कर्मचाऱ्यांनी दिले आहे. एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे थातूरमातूर कारवाईतून बड्या महाभागांना वाचविण्याचा प्रताप महापालिकेत होत आहे.

आयुक्तांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, निलंबनासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महेश मिस्तरी, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, डॉ. सुशील महाजन, राजेश पटवारी, धीरज पाटील आदींनी केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com