Nashik News: डॉ. प्राची पवार यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामागे होता हत्येचा कट!

पोलिसांकडून तिघा संशयितांना अटक करीत १६ दिवसांत गुन्ह्याची उकल केली.
Dr Prachi Pawar & arrested Criminals.
Dr Prachi Pawar & arrested Criminals.Sarkarnama

नाशिक : (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिवंगत आमदार डॉ. वसंतराव पवार (Dr. Vasant Pawar) यांच्या कन्या डॉ. प्राची पवार (Dr. Prachi Pawar) यांना ठार करण्याचाच कट रचून प्राणघातक हल्ला केल्याचे पोलिस (Police) तपासातून उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक झाली असून, त्यातील मुख्य संशयिताची आत्या कोरोनाकाळात सुश्रुत रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावली होती. (Attack on Dr. Prachi Pawar was a part of plan killing)

Dr Prachi Pawar & arrested Criminals.
Ahmednagar News : स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवलं...

कोरोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान आत्या मरण पावल्या आत्याचा राग धरून डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेषतः यासाठी मुख्य संशयिताने अन्य दोघांना प्रत्येकी दहा हजारांची सुपारी दिल्याचेही तपासातून समोर आले असून, गुन्ह्याची उकल अखेर १६ दिवसांनी झाली आहे.

Dr Prachi Pawar & arrested Criminals.
Fadanvis यांच्या जिल्ह्यात मंत्र्यांचे पुतळे जळत होते, पण पोलिसांना साधी भनकही नव्हती !

अभिषेक दीपक शिंदे (१९, रा. इंदुमती बंगला, प्रमोद महाजन गार्डनमागे, गंगापूर रोड), धनंजय अजय भवरे (१९, रा. काचणे, ता. देवळा, हल्ली रा. अवधूतवाडी, पंचवटी) व पवन रमेश सोनवणे (२२, रा. लोहणेर, ता. बागलाण, हल्ली रा. सातपूर कॉलनी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. अभिषेक हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असून, तो अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. या गंभीर गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तालुका पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा व तपास कुशल दहा अधिकारी व ४० पोलिस अंमलदारांच्या दहा पथकांनी हा गुन्हा उघड केल्याचे अधीक्षक उमाप यांनी सांगितले.

शहरातील सुश्रुत हॉस्पिटलच्या मुख्य संचालिका डॉ. प्राची पवार १३ डिसेंबरला सायंकाळी सव्वासातला इनोव्हा कारने गोवर्धन शिवारातील पवार फार्म हाउसवर जात असताना गेटवर अनोळखी तिघांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्यावर कोयत्याने वार केले होते. तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरू झाला. त्यात पवारांवर हल्ला केल्यावर तिघेही दुचाकीने नाशिक शहराच्या दिशेने वेगात पळून जातांना दुचाकीला अपघात झाला. त्यात ते जखमी झाले होते. त्यामुळे त्यांनी कोणत्यातरी रुग्णालयात उपचार केल्याची दाट शक्यता गृहित धरून तिघांचे वर्णन व तांत्रिक माहिती, विश्लेषणानुसार माहिती घेतली. त्यात त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समजताच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

अभिषेकने रचला हत्येचा कट

अभिषेक शिंदे याची आत्या कोरोनाकाळात १२ मे २०२१ ला सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मात्र, उपचारादरम्यान त्या मरण पावल्या. त्यामुळे अभिषेकसह त्याचे आई-वडील व सर्वच कुटुंब तणावात होते. आत्याच्या मृत्यूला डॉ. प्राची पवारच जबाबदार आहेत, याचा राग मनात धरून अभिषेकने त्याचा बेरोजगार मित्र धनंजय व पवनला प्रत्येकी दहा हजारांची सुपारी देत डॉ. पवार यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार अभिषेकने भद्रकालीतून चॉपरसारखे हत्यार खरेदी केले. घटनेच्या दिवशी डॉ. प्राची पवार हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीचा पाठलाग करून संशयितांनी घटनास्थळ गाठले होते.

तपासी पथकाला २५ हजारांची बक्षिसी

अपर अधीक्षक माधुरी कांगणे-केदार, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, पेठच्या उपअधीक्षक कविता फडतरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव, निरीक्षक नंदकुमार कदम, उपनिरीक्षक दीपक देसले, सुप्रिया अंभोरे, हवालदार गणेश वराडे, पोलिस नाईक संदीप हांडगे, विनोद गोसावी, संतोष नागरे, प्रकाश साळुंके, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, कासार, सहारे यांनी गुन्हा उघड केला. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या तपासी पथकाला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com