भाजप नेत्याला न्यायालयाने फटकारले, `ईडी`ने टाळले!

नंदुरबार पालिकेतील भाजप नेते चारुदत्त कळवणकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली.
Shivsena leader Chandrakant Raghuwanshi, Nandurbar.
Shivsena leader Chandrakant Raghuwanshi, Nandurbar.Sarkarnama

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) नगरपालिकेवर भाजपकडून (BJP) होत असलेल्या दोनशे कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर (Charudatta Kalawankar) यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. कुठलाही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधकांनी या साऱ्या प्रकरणात थेट ईडीकडुन (ED)चौकशीची मागणी केली होती. त्यावर देखील काहीच झाले नाही. मात्र न्यायालयात या बाबत कुठलेही पुरावे सादर करू न शकल्याने ही याचिका फेटाळली आहे.

Shivsena leader Chandrakant Raghuwanshi, Nandurbar.
मी मंजूर केलेली कामे देखील भाजपला करता आली नाही!

नंदुरबार नगरपरिषदेमध्ये विविध विकास कामांमध्ये २००५ ते २०२० या कार्यकाळात जवळपास दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने विरोधी भाजपकडून केला जात होता. यावरुन अनेक वेळा सभा प्रतिसभामधून रणकंदन देखील पहावयास मिळाले होते. या अनुषंगाने नंदुरबार नगरपरिषदेमधील भाजपचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांनी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये चारुदत्त कळवणकर यांनी संबंधित कार्यकाळात नंदुरबार नगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला होता.

Shivsena leader Chandrakant Raghuwanshi, Nandurbar.
हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याकडून कन्यादान!

न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याचे निष्कर्ष नोंदवला आहे. याचिकाकर्ते कळवणकर यांच्याकडे फक्त लेखापरिक्षण अहवाल असून, या पूर्वी प्रधानसचिवांनी १० जुलै २०१५ ला चौकशी अहवाल सादर केला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या व्यतिरिक्त कुठलेही ठोस असे पुरावे सादर करण्यात भाजपला अपयश आले आहे. या निकालानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

याचिकेद्वारे जनतेची दिशाभूल

भ्रष्टाचार झाला नसताना जनतेची दिशाभूल करण्यासाठी कांगावा करून दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाबाबत कोणतेही पुरावे नसल्याने न्यायालयाने याचिका फेटाळल्याने हे प्रकरण बरेच काही सांगून जात असल्याचे श्री. रघुवंशी यांनी सांगितले.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com