Ahmednagar Bazar Samiti
Ahmednagar Bazar Samiti Sarkarnama

Ahmednagar Bazar Samiti : नगर बाजार समितीत काटे की टक्कर; कोण मारणार बाजी?

Ahmednagar Agricultural Produce Market Committee : नगर बाजार समितीच्या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर कालच काही बाजार समित्यांच्या निवडणुकींचे निकाल समोर आले. आता आजही काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 16 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण बाजी मारणार? हे थोड्याच वेळात समोर येणार आहे. येथे भाजप व महाविकास आघाडीत मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Ahmednagar Bazar Samiti
Rahuri Bazar Samiti : राहुरीत विखे-कर्डिलेंना प्राजक्त तनपुरेंचा जोरदार दणका : बाजार समितीत 16 जागांवर दणदणीत विजय

नगर बाजार समितीत गेल्या पंधरा वर्षापासून भाजप नेते शिवाजी कर्डिले आणि माजी सभापती भानुदास कोतकर यांची एकहाती सत्ता आहे. मात्र, कर्डिले आणि कोतकर यांची ही सत्ता उलथून टाकण्यासाठी महाविकास आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरून आव्हान दिले आहे.

Ahmednagar Bazar Samiti
Vadwani APMC Election : महाविकास आघाडीने खाते उघडले,वडवणीत एकहाती सत्ता..

दरम्यान, नगर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नगर बाजार समितीच्या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com