झालेली कामे पुन्हा दाखवून महापालिकेत कोटींचा घोटाळा
Dasharath Patil News, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

झालेली कामे पुन्हा दाखवून महापालिकेत कोटींचा घोटाळा

शहरातील विकासकामांबाबत माजी महापौर दशरथ पाटील यांची चौकशीची मागणी

नाशिक : महापालिकेतील (NMC) लोकनियुक्त कार्यकाळ संपलेला आहे. या कालावधीत नगरसेवक निधीच्या नावाखाली कामे यापूर्वीच झाली आहेत. रस्ते, भूमिगत गटारी नूतनीकरण व दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा तीच कामे सुचवून उखळ पांढरे करून घेतले जात आहे. त्याची चौकशी करावी अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील (Dasharath Patil) आणि शिवसेनेचे (Shivsena) प्रेम पाटील यांनी केली आहे. (Ex Mayor Deemands enquiry in NMC Work)

Dasharath Patil News, Nashik Latest Marathi  News
आमदार कुणाल पाटील यांचा भाजपला `जोर का झटका`

या माध्यमातून मोठा घोटाळा झाला आहे या गैरव्यवहाराची तातडीने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Nashik Latest Marathi News)

Dasharath Patil News, Nashik Latest Marathi  News
एकनाथ खडसेंच्या विजयाने तापी खोऱ्यात ‘दिवाळी’

माजी महापौर पाटील म्हणाले, एकदा झालेल्या कामांत संबंधित विभागाकडून ढोबळ पद्धतीने इस्टिमेट बनविले जाते. असे असताना एकत्रित रक्कम दर्शवून प्रत्येक रस्त्याचे नाव न दर्शविता भ्रष्टाचारासाठी पळवाट ठेवली जाते. कामांचे सविस्तर इस्टिमेट तयार करणे आवश्यक आहे. असे असताना ले-आउट मधील सर्व्हे नंबर अथवा गट नंबर आणि महापालिका हद्दीतील गाव शिवाराचा उल्लेख केला जात नाही. रस्त्याच्या लांबी, रुंदी, साइड पट्टयांची कामे पूर्ण न करता उधळपट्टीतून दायित्व वाढविले गेले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात २५० कोटीची रस्ते दोन वर्षापूर्वी दाखविली होती. त्याचा कामनिहाय खर्चाचा ताळमेळ नाही. सहा महिन्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यात ४०० कोटींचे रस्त्यांची कामे जाहीर केली. त्याचा कामनिहाय खर्चाचा ताळमेळ आणि महापालिका हद्दीतील मुदतपूर्व कामांच्या व जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक पावसाळ्यात ६० ते ७० कोटी रुपये डागडुजीसाठी होणारा खर्च तपासणे आवश्यक आहे.

आयुक्तांनी, ज्या कामांची व इस्टिमेट झाली आहेत, त्या कामांच्या मंजुरीचे विषय तपासावे, याची चौकशी लेखापरीक्षण विभागामार्फत चौकशी करावी. मुदत संपलेली कामांचा आढावा घ्यावा. नवीन ड्रेनेजलाइन टाकल्यानंतरदेखील गोदावरी वालदेवी, नासर्डी या सर्व नद्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळले जात असून या तीनही नद्यांच्या पानवेली वाढली आहे. अनावश्यक खर्च, ढोबळ पद्धतीने प्राकलन मंजुरीच्या चौकशा करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in