धक्कादायक, भाजपच्या सत्तेत कचऱ्यात दरमहा ९० लाखांचा भ्रष्टाचार!, पैसा जातो कुठे?

महापालिकेच्या महासभेत काल कचरा विषयावर चांगलाच गोंधळ झाला
Dinkar Patil & Ajay Boraste
Dinkar Patil & Ajay BorasteSarkarnama

नाशिक : हे शहर तीर्थस्थळ आहे. अशी ख्याती सर्वदूर आहे. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत फक्त सफाई कामगारांच्या कंत्राटात दरमहा चक्क ९० लाखांचा गैरव्यावहार केला जातो, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला आहे.

Dinkar Patil & Ajay Boraste
`भाजप`, शिवसेनेला विसर, `मनसे`चे मात्र शिवसेनाप्रमुखांना आगळे अभिवादन!

महापालिकेची महासभा काल झाली. यावेळी कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीचा विषय होता. त्यावर चर्चा होण्याएैवजी महासभा रंगली ती वॅाटरग्रेस या कंपनीच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या विषयावर. ही कंपनी गैरव्यावहार करते. त्यात महापालिकेचे प्रशासन सामील आहे. अधिकारी व कंत्राटदारांचे संगनमत झाले आहे. या कंपनीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १५ हजार रुपये घेतले आहेत. ते कंपनीने मान्य देखील केले आहे. तरीही अधिकारी कारवाई करीत नाही, याचे कारण काय? असा प्रश्न पाटील यांनी केला.

Dinkar Patil & Ajay Boraste
सेना, राष्ट्रवादीनेच सरकारचे वाभाडे काढल्याने विरोधी पक्षांची गरजच पडली नाही!

श्री. पाटील म्हणाले, या कंपनीने सातशे कर्मचारी नियुक्त केल्याचे बोलले जाते. त्यांना महापालिका किमान वेतन दराने दरमहा बावीस हजार रुपये वेतन देते. मात्र कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात केवळ आठ ते दहा हजार रुपयेच मिळतात. म्हणजेच सपाई कामगार ठेक्यात दरमहा किमान ८० ते ९० लाखांचा घोटाळा होत आहे. त्याची चौकशी करावी. हा शहराच्या हिताचा प्रश्न आहे. जी मुले काम करतात, ती या शहरातील आहे. ती चांगले काम करतात. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. महापौरांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यात काय निष्पन्न होते याची प्रतिक्षा आहे. याबाबत मी पाठपुरावा करणार आहे.

केवळ चर्चा नको, कारवाई हवी

सफाई कामगारांच्या कंत्राटात घोटाळा होतो आहे. त्याची चौकशी व्हावी असे महापालिकेतील सर्वच नगरसेवकांचे मत आहे. नेमलेल्या लोकांकडून पैसे घेतले असे ठेकेदाराने लिहून दिले आहे. तरीही चौकशी, कारवाई काहीच कसे होत नाही, कारण सत्ताधाऱ्यांची हिंमत वाढली आहे. त्यांचे यात साटेलोटे आहे. त्यांनी केवळ छापेकाटे करत बसू नये. हिम्मत असेल तर ठेका रद्द करून दाखवावा. केवळ चर्चा करून फसवणूक करू नये, असे विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी सांगितले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com