नगरसेवक म्हणतात, `लोक आमच्यावर कचरा टाकतील`

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या बैठकीत मांडली कैफियत
Dhule corporation Building

Dhule corporation Building

Sarkarnama

धुळे : कचरा संकलन, अस्वच्छतेप्रश्‍नी प्रभागातील नागरिक आता सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर कॉमेंट करायला लागले आहेत. प्रभागात फिरताना नागरिक अंगावर कचरा टाकतील, शिवीगाळ करतील, अशी भीती वाटते, अशी कैफियत स्थायी समितीच्या सभेत (Dhule corporation) विरोधी सदस्यांनी बोलून दाखविली. यावर अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आठ ते दहा दिवसांची मुभा मागून वेळ मारून नेली.

<div class="paragraphs"><p>Dhule corporation Building</p></div>
भुजबळ-कांदे वाद; अखेर `ती` बैठक ठरली!

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विरोधी पक्ष सदस्यांनी पुन्हा एकदा आपली कैफियत मांडून समस्या कधी सुटेल, याबाबत जाब विचारला. विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कमलेश देवरे म्हणाले, की चार-पाच महिन्यांपासून याप्रश्‍नी पाठपुरावा करीत आहे. ९ डिसेंबरला बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी १५ दिवसांत कार्यवाही होईल, असे सांगितले होते. त्या वेळी मी कार्यवाही न झाल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा आणून टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, आयुक्तांनी चार दिवस थांबा, अशी विनंती केली होती.

<div class="paragraphs"><p>Dhule corporation Building</p></div>
नव्या वर्षात छगन भुजबळांनी नाशिकला दिले `हेल्दी` गिफ्ट!

ते म्हणाले, त्यानंतरही थांबलो. मात्र, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. प्रभागात लोक आता सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर कॉमेंट करायला लागले आहेत. जमत नसेल, तर राजीनामा द्या, असे म्हणतात. त्यामुळे आता काय करायचे तुम्हीच सांगा, असा प्रश्‍न श्री. देवरे यांनी केला आहे. आता दोन दिवसांत प्रश्‍न मार्गी लागला नाही, तर अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात कचरा टाकेन, असा इशाराच त्यांनी दिला. दरम्यान, ते या विषयावर पोटतिडकीने बोलत असताना, आस्थापना विभागप्रमुख रमजान अन्सारी, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना काहीतरी सांगत असल्याचे पाहून श्री. देवरे संतापले व यापुढे सभेत काहीच बोलणार नाही, असे म्हणत आपला विरोध व्यक्त केला.

प्रभागात भीती वाटते

समाजवादी पक्षाचे सदस्य अमीन पटेल म्हणाले, की प्रभागात फिरणे आता मुश्कील झाले आहे. नागरिक अंगावर कचरा टाकतील, शिवीगाळ करतील का, याची भीती वाटते. मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी एका बालिकेला दहा कुत्र्यांनी धरले होते, त्याचा व्हिडिओही आपण अतिरिक्त आयुक्तांना टाकला होता, असे म्हणत उपाययोजना का होत नाही, असा प्रश्‍न केला. सत्ताधारी भाजपचे सदस्य अमोल मासुळे यांनीही दरवेळी अधिकारी विषयाला खो देतात. त्यामुळे त्यांच्यावर ॲक्शन घ्या, अशी मागणी केली.

आदेशाची यादीच करा

सदस्य नागसेन बोरसे सभापती संजय जाधव यांना उद्देशून म्हणाले, की वर्षभरात आपण किती आदेश दिले त्याची यादी करा व त्यातील किती आदेशांची अंमलबजावणी झाली, कार्यवाही झाली ते तपासा व यासाठी स्वतंत्र सभा घ्या.

पुन्हा नजरचूक...

स्थायी समितीपुढे पुन्हा एकदा नजरचुकीने विषय आल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला. बांधकाम विभागातील ओव्हरसियरने गटार व रस्ता कामाचे दोन विषय नजरचुकीने आल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी असे नजरचुकीने विषय कसे येतात, असा सवाल केला. त्यामुळे हे विषय काढून टाकण्यात आले, तर इतर चार कामांचे विषयही तपासून घ्या, अशा सूचना सभापती जाधव यांनी केल्या. दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रावरील केमिस्टच्या विषयावरही सुनील बैसाणे, शीतल नवले यांनी प्रश्‍न उपस्थित केल्याने तो विषय रद्द करण्यात आला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com