नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केली नाशिक ते पंढरपूर सायकल वारी!

नाशिक सायकलिस्ट फौंडेशनच्या पर्यावरण व आरोग्य मोहीमेत नोंदविला सहभाग
नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केली नाशिक ते पंढरपूर सायकल वारी!
Sangita Gaikwad & CyclistsSarkarnama

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फौंडेशनच्या पर्यावरण व आरोग्य मोहीमेत सदस्यांनी नाशिक ते पंढरपूर सायकल वारी करण्यात आली. यामध्ये नाशिकच्या नगरसेविका संगीता गायकवाड (Sangita Gaikwad) यांनीही भाग घेऊन ही सायकल वारी पूर्ण केली. त्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Sangita Gaikwad & Cyclists
महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे ‘फसवणुकीची दोन वर्षे’

नाशिक सायकलिस्ट फौंडेशनतर्फे संस्थेच्या #NET zero india या उपक्रमांतर्गत नाशिक ते पंढरपूर सायकल अभियान राबविण्यात आले. यामध्ये शुक्रवारी (ता.१९) सकाळी सहाला नाशिकहून निघालेली सायकल वारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाचला पंढरपूर येथे पोहचली. या सायकल मोहिमेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका व महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती सौ. गायकवाड या सायकल वारीत आपला सहभाग नोंदवून पर्यावरण जनजागृतीसाठी प्रबोधन केले.

Sangita Gaikwad & Cyclists
धुळे बँक निवडणूक: शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी विजयी

संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेकडून यापूर्वी देखील नाशिक ते पंढरपूर वारी करण्यात आली आहे. या वारीत जेष्ठ नागरिक, अंध, दिव्यांग, व्यक्तींनी देखील सायकल चालवत पंढरपूर सायकल वारी पूर्ण केली. यावेळी सर्व सायकलिस्ट यांचा पंढरपूर येथे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिष बैजल व सौ. छाया बैजल, पंढरपूरचे विभागीय उपायुक्त विक्रम कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रविवारी (ता. २१) सकाळी मंदिर प्रदक्षिणा घालून सायकललिस्ट यांनी पर्यावरण व आरोग्य विषयक संदेश पंढरपूरवासी व सर्व वारकऱ्यांना दिला. विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारीची सांगता झाली. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, वारी प्रमुख चंद्रकांत नाईक, किशोर माने व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या सर्व सायकलिस्ट टीमचे आभार व्यक्त केले.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in