Jalgaon Politics; गोळीबारातून उघड झाली नगरसेवकांची लाखोंची फूटपाथविक्री

जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांची फुले मार्केटमधील अतिक्रमणातील लाखो रुपयांची फुटपाथ विक्री
Jalgaon Municiple corporation
Jalgaon Municiple corporationSarkarnama

जळगाव : येथील (Jalgaon) महापालिकेच्या (Municiple corporation) फुले मार्केटमधील अतिक्रमण आजवर कुणीच मोकळे करू शकले नाही. कारण, या विक्रेत्यांना वसविणारे दुसरे कोणीच नसून नगरसेवकच (Corporators) आहेत. फुटपाथवरील या जागांची लाखो रुपयांत विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार चर्चेत आहे. यामध्ये नगरसेवक, राजकीय नेत्यांचे मानसपुत्र, अशांची खूप मोठी साखळी यासाठी कार्यरत आहे. (Political & administration nexus in Jalgaon city encroachment of Phule market)

Jalgaon Municiple corporation
Devendra Fadanvis म्हणाले, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही...

या भागात आग लागली, तर अग्निशमन दलाचा बंब तर सोडाच दुचाकीही जाऊ शकत नाही. मात्र, आजवर कुठलाच आयुक्त, महापौर, अतिक्रमण विभागप्रमुख असो, की पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक असोत कोणीही हे मार्केट मोकळे करू शकलेले नाही. त्यात अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, शहरातील विविध संघटना, पोलिस कर्मचारी अशी साखळी आहे.

Jalgaon Municiple corporation
Heeraben Modi passed away : पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं निधन

शहरातील टॉवर चौक ते चौबे शाळेदरम्यानचे अतिक्रमण काढण्याबाबत महापालिकेत तक्रार दिल्याच्या रागातून तक्रारदारावर रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला होता. या गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना दहा दिवसानंतर अटक झाली. मात्र, शहरात अतिक्रमणाचा अर्ज दिला, तरी गोळीबार होतो. अतिक्रमणाच्या अर्थचक्राचा धनी कोण आणि कोण-केाणत्या गँग शहरात अतिक्रमणावर पोसल्या जाताहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे.

शिवाजीनगरातील भगवान काशिनाथ सोनवणे (वय ३९) यांनी टॉवर चौक ते चौबे शाळेदरम्यान असलेल्या अतिक्रमण काढण्याबाबत महापालिकेत तक्रारी अर्ज दिला होता. मुळात हा तरुण असा अर्ज करतो आणि त्यावर महापालिका कुठलीच ॲक्शन घेत नाही. अर्जदार कोण? याचा शोध घेऊन संबंधित तरुणावर चक्क शहरात मध्यवर्ती ठिकाणी दोन राऊंड गोळीबार होतो. पोलिस चक्क दहा दिवस या संशयितांना अटक करू शकले नाही, तर आजतागायत महापालिकेतील कुठलाच अधिकारी, कर्मचारी असोत, की सत्ताधारी पक्षातील पुढारी एकाच्याही तोंडातून या अतिक्रमणाबाबत ‘ब्र’ देखील निघालेला नाही.

दहा दिवसांनी संशयित स्वत: हजर

दहा दिवसानंतर किरण शंकर खर्चे (सुप्रीम कॉलनी), पंकज ऊर्फ ढेक्या सुरेश पाटील (रा. शिवकॉलनी) या संशयितांनी पोलिसांना थेट संपर्क करून शाश्‍वती मिळाल्यावर स्वतःहून अटक करवून घेतली. वास्तविक पाहता अर्जदार आणि गोळीबार करणारे या दोघांचाही या अतिक्रमणाशी दुरान्वये संबध नाही. अर्ज करवून घेणारा जसा वेगळा आहे, तसाच अर्जदारावर गोळीबार करवून घेणारेही वेगळेच कुणीतरी असल्याची चर्चा जळगाव शहरात रंगली आहे.

दोघांना अटक; प्रकरण थंड

शहरातील टॉवर चौक ते, चौबे शाळेदरम्यानचे अतिक्रमण म्हणजे मोठमोठ्या मिळकती बिल्डींग्ज नव्हे, तर फुले मार्केट, गांधी मार्केट आणि संपूर्ण बाजारपट्ट्यातील छोटे व्यावसायिक हातगाडी व ठेले लावून साहित्य विक्रेत्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करा. विशेषतः फुले मार्केटेचे फुटपाथ आणि आतील सर्वच विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार भगवान सोनवणे याने केली होती आणि त्याच कारणाने गोळीबार करणाऱ्यांचा या अतिक्रमणाशी काडीमात्र संबध नसल्याचे विश्वसनीय सूत्रान्वये माहिती समोर येत आहे.

फुले मार्केटमध्ये ठेला, दुकान लावून व्यवसाय करणाऱ्यांच्या कष्टाच्या कमाईवर तब्बल २५ ते ३० वर्षांपासून गुन्हेगारी टोळ्या पोसल्या जात आहेत. तत्कालीन नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पुत्राच्या विशिष्ट गटाची या अतिक्रमणधारंकावर सुरवातीला पकड होती. कालपरत्वे त्यात बदल होत गेले. आता त्याला अधिकृत ‘डेली वसुली’चा मुलामा महापालिकेने चढविला असला, तरी या विक्रेत्यांवर विविध टोळ्यांचीच सत्ता कायम आहे. अमूक एका भाऊची १५ दुकाने, नानाची तीन, पोलिस दादाच्या पाच जागा. त्यांच्यावरील विक्रेत्यांचे रक्षण सर्वस्वी तेच करणार, अशा तब्बल दोन ते अडीच हजार विक्रेत्यांवर गुन्हेगारीचे अर्थचक्र चालविले जात आहे.

जागा विक्री, पतपुरवठाही

फुले मार्केटमध्ये फुगे विक्रीसाठही उभे राहायचे असेल, तर महापाकिलेच्या डेली वसुलीची पावती फाडावीच लागते. मात्र, या जागेचा लाखो रुपयांचा मोबदला गुंडांना मोजावा लागातो. चार बाय चारच्या फुटपाथसाठी चक्क पाच ते सहा लाखांचा भाव फुले मार्केटमध्ये सुरू आहे. तहसीलदार, महापालिका, जिल्‍हाधिकारी इतकच काय तर मुख्यमंत्री व राज्यपालही फुले मार्केटच्या गाळेधारकांना शाश्वती देऊ शकत नाही. तिथे चक्क पाच लाखांत फुटपाथची जागा देणारी टोळी व्यवसायासह, स्वरक्षण आणि वेळ पडल्यास चक्रवाढ व्याजाने पतपुरवठाही करते. हप्ते वसुली वेगळी केली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in