गडकरी येता घरी...महापालिका एका रात्रीत १६ लाखांचा रस्ता करी!

धुळे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यापूर्वी पाहणी करताना जिल्हाधिकारी.
गडकरी येता घरी...महापालिका एका रात्रीत १६ लाखांचा रस्ता करी!
Nitin Gadkari News, Dhule Latest News Updates, Nitin Gadkari Dhule visit, Nitin Gadkari's Dhule tourSarkarnama

धुळे : धुळे (Dhule) शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. भूयारी गटार योजना व अन्य कामांमुळे शहरात धड रस्ता (Roads in bad condition) नाही. त्यासाठी नगरसेवक (Corporators) सतत आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाने झाले नाही ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) दौऱ्याने झाले. गडकरी भेट देणार असलेल्या कार्यकर्त्याच्या घराचा रस्ता एका रात्रीत चकाचक करण्यात आला आहे. (Nitin Gadkari's Dhule tour)

Nitin Gadkari News, Dhule Latest News Updates, Nitin Gadkari Dhule visit, Nitin Gadkari's Dhule tour
रावेरला उघड झाला दीड कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी विविध कार्यक्रमांसाठी धुळे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते हेमंत मराठे यांच्या देवपूरमधील इंदिरा गार्डन परिसरातील निवासस्थानीही जाणार आहेत. या भागात भूयारी गटार योजनेतील खोदकामामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्यामुळे श्री. मराठे यांच्या निवासस्थान परिसरातील रस्ता चकाचक होण्यासाठी महापालिकेने १६ लाखांचा निधी मंजूर करत काम सुरू केले आहे.

Nitin Gadkari News, Dhule Latest News Updates, Nitin Gadkari Dhule visit, Nitin Gadkari's Dhule tour
शिक्षण विभाग बदनाम; आधी लाचखोरी आता महिलेवर अत्याचार?

मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत पालेश महाविद्यालय, अग्रवाल विश्राम भवनासमोर आणि राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात विविध कार्यक्रम होतील. तसेच ते देवपूरमधील स्वामी नारायण मंदिरालाही भेट देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मंत्री गडकरी यांच्या दौऱ्यासंबंधी सर्व मार्ग व कार्यक्रम स्थळांची बुधवारी दुपारनंतर पाहणी केली. तसेच संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.