आधी कार्यालयाला कळवा, नंतरच संस्थांना भेटी द्या!

रविंद्र कुमार सिंगल यांच्या निर्णयामुळे वैध मापन शास्त्र विभागात येणार पारदर्शकता.
Dr Ravindra Kumar Singal
Dr Ravindra Kumar SingalSarkarnama

मुंबई : वैध मापन शाश्त्र विभागाच्या नियंत्रकांकडून विविध अस्थापनांना भेटी दिल्या जातात. यातील अनेक भेटी पुर्वसूचना ने देता करण्यात येत असल्याने त्याबाबत तक्रारी येतात. आस्थापनांना होणारा हा त्रास वाचविण्यासाठी या विभागाचे नियंत्रक डॅा. रविंद्र कुमार सिंगल (Dr. Ravindra kumar Singal) यांनी पुढाकार घेतला आहे. (Now Controllers binding to convey controller Office)

Dr Ravindra Kumar Singal
मोदी सरकारमुळे शोषित, वंचितांना संरक्षण मिळाले

याबाबत कार्यालयाने विभागीय सह नियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाणेपूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास माहिती देण्यात यावी. उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाणेपूर्वी त्याबाबतची माहिती सह नियंत्रक कार्यालयास आगाऊ देण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहे. याबाबत यापूर्वी शासनाने २६ नोव्हेंबर २०१९ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यात याविषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.

Dr Ravindra Kumar Singal
पुणतांबे येथील शेतकरी आंदोलकांना जाऊन नाना पटोले, बाळासाहेब थोरात भेटले : म्हणाले...

https://www.youtube.com/watch?v=0xOyWQRLxzwवेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा घालण्यासाठी यंत्रणेतील सह नियंत्रक यांनी भेटीबाबत मुख्यालयास आगाऊ माहीती दिली असल्याबाबतची खातरजमा संबधित व्यापारी आस्थापनांना ०२२-२२६२१९६८ या दुरध्वनी क्रमांकावर करता येईल.

उपनियंत्रक यांच्या भेटीबाबत विभागीय कार्यालयांशी संपर्क करून खातरजमा करता येईल, असे आवाहन नियंत्रक कार्यालयाकडून व्यापारी आस्थापनांना करण्यात आले आहे.

याबाबत मुंबई महानगर विभाग (०२२-२४१४८४९४), ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यांसाठी- कोकण विभाग (०२२-२७५ ७४०७४), पूणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांसाठी- पूणे विभाग (०२०-२६६९७२३२), नाशिक, अहमदनगर, धूळे, नंदूरबार, जळगांव या जिल्ह्यांसाठी- नाशिक विभाग- ०२५३-२४५५६९६, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी- औरंगाबाद विभाग- ०२४०- २९५२६५६, अमरावती, यवतमाळ, बुलढ़ाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांसाठी- अमरावती विभाग - ०७२१-२९९००३८, आणि नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांसाठी नागपूर विभाग- ०७१२- २५४०२९२ या क्रमांकावर आस्थापना व संस्था खातरजमा करू शकतील, असे राज्याच्या वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक डॅा. रविंद्र कुमार सिंगल यांनी कळविले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com