नितीन गडकरी नाशिकला बोलले ते तंतोतंत खरे ठरले!

ठेकेदारांनी ‘यू- टर्न’ घेतल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांकडे गर्दीला ओहोटी.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

नाशिक : ठेकेदार व्यावसायिक असतात सत्तेला त्यांना सलाम करावाच लागतो. जिकडे सत्ता तिकडे ठेकेदारांची सत्ताधाराच्या भोवती गर्दी होतेच. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यापूर्वी नाशिकमध्येच केलेले वक्तव्य राज्यातील सत्ता पलटताच खरे ठरले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या शिवसेना (Shivsena) काँग्रेस व राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांभोवती गोंडा घालणाऱ्या ठेकेदारांनी सत्ता बदलाच्या काही तासातच यु टर्न घेत आता भाजप आमदारांकडे गर्दी वाढविली आहे. (Contractors have change immediatly after Government change)

Nitin Gadkari
निवडणूक ‘मविप्र’ संस्थेची, चर्चा मात्र राज्यपातळीवर

२०१४ मध्ये राज्यात भाजप- शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे आले. महाजन यांच्याकडे राज्याचा व्याप असल्याने पालकमंत्र्यांचे काम तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप बघायचे. त्यामुळे सानप यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी राहायची. मंत्र्यांच्या निवासस्थानी नसेल एवढी गर्दी पंचवटीतील कृष्णनगर मध्ये होत. त्यापूर्वी भुजबळ फार्मवर चकरा मारणारे ठेकेदार कामे मिळवण्यासाठी सानप यांच्याभोवती पिंगा घालू लागले होते.

Nitin Gadkari
बंडखोर आमदारांसाठी मुंबईतील रस्ते मोकळे केले...

कामे मिळवण्यासाठी पक्ष बदलदेखील झाले. त्या वेळी भाजपमध्ये कधी न दिसणाऱ्यांनी अचानक सक्रिय होऊन समृद्धी महामार्गाची कामे मिळवली. अनेकांनी ग्रामीण भागात मोठी कामे मिळवली. २०१९ च्या सत्तांतरांत जिल्ह्यात सत्तेचा भाग पुन्हा राष्ट्रवादीकडे आल्याने भाजप नेत्याभोवती पिंगा घालणारे ठेकेदार पुन्हा वाढले. अडीच वर्षाच्या काळानंतर पुन्हा स्वतंत्र होऊन पाहायला मिळाले. त्यात भाजप व शिवसेना आमदारांची सत्ता आल्याने आता ठेकेदारांनी यू टर्न घेत आपला मोर्चा सत्ताधाऱ्यांकडे वळविला आहे.

समृद्धी ते ग्रीन फील्ड

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेकांना पाणी मारण्यापासून ते माती उचलण्यापर्यंतचे कामे २०१६ ते २०१९ या कालावधीत मिळाली होती. आता सत्तांतरानंतर नाशिक म्हणून जाणाऱ्या सुरत- चेन्नईकडे ठेकेदारांचे लक्ष लागले आहे. नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रस्थापित न्यू मेट्रो या प्रकल्पांची कामे मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरवात झाली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड तसेच केंद्र सरकारकडून नाशिकमध्ये होणाऱ्या कामांची कंत्राटी मिळवण्यासाठी ठेकेदार आता भाजप नेत्यांच्या घरी घिरट्या मारू लागले आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com