बापरे...विमा कंपनीला २२ कोटी भरपाईचे आदेश!

नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीचा ग्राहकाच्या बाजून दिला निर्णय
Fire claim issue
Fire claim issueSarkarnama

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar District consumer court) जिल्हा ग्राहक समितीच्या तक्रार निवारण आयोगाने ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ अन्वये सर्वात मोठ्या रकमेचा ऐतिहासिक न्याय निर्णय दिला आहे. एव्हढ्या मोठ्या भरपाईचा (Repayment) आदेश दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. आता विमा कंपनी (Insurance compony) काय भूमिका घेते याची उत्सुकता आहे. (Conumer court of Nandurbar order for 22 Cr. Compensation)

Fire claim issue
धुळे शहरात `एमआयएम` विरूद्ध भाजप संघर्ष पेटला

दोंडाईचा येथील के. एस. कोल्ड स्टोअरेज वेअर हाऊसला २ सप्टेंबर २०१९ ला आग लागली होती. या कोल्ड स्टोअरेजच्या मालकांनी नुकसान भरपाईपोटी २५ कोटी मिळावे, यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडे दावा दाखल केला होता.

Fire claim issue
वादग्रस्त बकालेंना उद्या तरी जामीन मिळेल का?

मानवी हस्तक्षेपामुळे कोल्ड स्टोअरेजला आग लागल्याचा ठपका ठेवत विमा कंपनीने दावा नाकारला होता. त्यानंतर कोल्‍ड स्टोअरेजच्या मालकाने नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

सदर प्रकरणांचे कामकाज आयोगाचे अध्यक्ष संजय बोरवाल, सदस्य भारती केतकर, मोहन बोडस यांच्या समक्ष चालले. दोन्ही पक्षाचे युक्तीवादाअंती आगीच्या नुकसानी पोटी विमा कंपनीने भरपाई म्हणून २२ कोटी ५९ लाख ३९ हजार ७४५ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिले. एवढेच नव्हे तर मानसिक, शारीरिक त्रास तसेच तक्रार अर्जाचा खर्च तीन लाख रुपये वेगळे द्यावे असेही निकालपत्रात म्हटले आहे. असे नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com