शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या हातून झालेल्या शेतकरी हत्या प्रकरण.
शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
Congress agitation on LakhimpurSarkarnama

नाशिक : उत्तर प्रदेशमधील शेतकरी हत्याकांड (U. P. Farmers Bloodshed) व काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Congress leader PriyankaGandhi) यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने (Congress paty demonstrations) करून निषेध करण्यात आला. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात (Against Modi Government) जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Congress agitation on Lakhimpur
नितीन गडकरींचे गिफ्ट; नाशिक-मुंबई महामार्गाचे कॉंक्रिटीकरण!

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या हातून झालेल्या शेतकरी हत्या प्रकरणानंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली. त्याचा आणि शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ सोमवारी (ता.४) काँग्रेस भवन येथे शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या वेळी योगी मोदी सरकार मुर्दाबाद, किसान विरोधी नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी यांना अटक करणाऱ्या योगी सरकारचा निषेध असो, शेतकरी हत्याकांड करणाऱ्या योगी सरकारचा निषेध असो आदी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शरद आहेर म्हणाले, की मोदी सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर व देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडी घालत शेतकऱ्यांची हत्या केली. मोदी आणि योगीच्या ‘जनरल डायरचे वंशज’ सत्तेवर असल्याचे श्री. आहेर म्हणाले. आंदोलनात आमदार डॉ. सुधीर तांबे, माजीमंत्री शोभा बच्छाव , शहराध्यक्ष शरद आहेर, माजी खासदार प्रताप वाघ, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे, राहुल दिवे, बबलू खैरे, दिनेश निकाळे, विजू पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...

Related Stories

No stories found.