माजी मंत्री सुभाष भामरेंच्या भावाचा दारूण पराभव: काँग्रेसच्या शरद पाटलांचा दणका

जाएंट किलर शरद पाटील यांनी केला अमरीशभाईंचे प्रबळ नेते सुरेश भामरेंचा पराभव.
माजी मंत्री सुभाष भामरेंच्या भावाचा दारूण पराभव: काँग्रेसच्या शरद पाटलांचा दणका
Sharad Patil wins in DCC ElectionSarkarnama

नाशिक : धुळे- नंदुरबार जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत भाजप नेते अमरीशभाई पटेल यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले. मात्र काँग्रेसचे प्रा. शरद पाटील (Sharad Patil) यांनी भाजपचे दिग्गज, खासदार सुभाष भामरे व अमरीशभाई यांचे सहकारी सुरेश भामरे यांचा दणदणीत पराभव केला. सबंध विजयाच्या आनंदावर बोळा फिरवणारा हा पराभव आहे. त्यामुळे हा धक्कादायक निकाल म्हणजे शरद पाटील यांचे आगामी पाच वर्षासाठी प्रस्थापित अमरीशभाईंसह (Smrishbhai Patel) माजी मंत्री जयकुमार रावल(Jaykumar Rawal), गुलाबराव देवर(Gulabrao Devkar) , खासदार सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या अडचणीत भर टाकण्याचे संकेत आहेत.

Sharad Patil wins in DCC Election
पालकमंत्री के. सी. पाडवींना होम पीचवर शिवसेनेचा राजकीय झटका!

पराभूत झालेले सुरेश भामरे हे दोन वेळा संचालक होते. सध्या ते धुळे बाजार समितीचे चेअरमन आहेत. त्यांची शिक्षण संस्था आहे. त्यांची पत्नी मंगलाताई सुरेश भामरे या धुळे जिल्हा परिषदेत महिला बाल कल्याण समितीच्या सभापती तसेच बँकेच्या संचालक देखील होत्या. त्यांचे वडील (कै) रामराव सीताराम पाटील भामरे वीस वर्षे बँकेचे संचालक तसेच चेअरमन होते. रामराव हे धुळे जिल्ह्यातील राजकारणातील बडे प्रस्थ व काँग्रेसचे नेते होते. त्या काळात बॅंकेची महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६१ कलम ८८ अन्वये चौकशी झाली होती.

Sharad Patil wins in DCC Election
गिरीश महाजन साईडट्रॅक करून एकनाथ खडसेंनी जळगाव बँकेचे मैदान मारलेच!

आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री डॅा सुभाष भामरे या सर्वच नेत्यांनी सुरेश भामरे यांच्या विजयासाठी कंबर कसली होती. हे सर्व नेते मतदानाच्या दिवशी बुथवर थांबून होते. मात्र माजी आमदार व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे पाच उमेदवार होते. त्यातील श्री. रघुवंशी, शरद पाटील आणि भडगावचे संदीप वळवी हे तीन संचालक विजयी झाले.

या गटात एकुण २१० मतदार आहेत. त्यातील ४ मयत आहेत. मात्र एका मयत मतदाराचे मतदान निवडणूकीत मतदानाची प्रक्रीया सुरु झाल्यावर शिरपूर येथे मतदान झाल्याचे उघड झाले. ती यादी पुढे आल्यावर त्या मयत मतदाराचे मतदान कसे झाले यावरून चांगलाच वाद देखील झाला. त्यामुळे कदाचीत श्री पाटील एका मताने पराभूत झाले असते तरी तो न्यायालयीन मुद्दा झाला असता. यामध्ये तीन मते बाद झाली. दोन मतदार विमानाचे तिकीट न मिळाल्याने प्रवासात अडकल्याने त्यांचे मतदान होऊ शकले नाही. एकुण २०२ मतदान झाले. त्यात शरद पाटील १२१ मते मिळाली. त्यांची दोन मते बाद झाली.

निकाल जाहीर झाल्यावर माजी आमदार प्रा. शरद पाटील म्हणाले, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वारंवार कलम ८८ व अन्य प्रकारे तक्रारी आल्यावर चौकशी होते. कलम ११ (१) अन्वये बँकेला विविध वेळी नोटीस येते. अनेकदा बँकेचे बँकींग लायसन जप्त केले जाते. तशा नोटीसा येणे. वारंवार बँक आर्थिक डबघाईस येते. याला जी कारणे आहेत, ती शोधून काढायची आहेत. डॅा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी व त्याअंतर्गत बँकेला मिळालेले १४०० कोटी रुपये याचा विनियोग काय व कुठे झाला हे सभासदांना अद्याप समजलेले नाही. कॅाटन फोल्डर योजना तयार करून यातील काही संचालक व त्यांचा हितसंबंधी यांनी टेक्साटाईल पार्क तयार केले आहेत. हे नविन कर्ज प्रकरण तयार केले. या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना करणे आणि बँक सुधृढ व सक्षम करून सभासदांच्या विकासासाठी अनुकूल कारभार करण्याचा ध्यास घेतला आहे. हे प्रस्थापितांना जड जाण्याचीच शक्यता नाकारता येत नाही.

....

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in