Karnataka election result : बजरंगबलीच्या घोषणा देत काँग्रेसचा विजयोत्सव!

नाशिक शहर काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील विजयोत्सव साजरा केला, तर सेवादलातर्फे हनुमान पूजन केले.
Cnogress workers celebration
Cnogress workers celebrationSarkarnama

Karnataka election result : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कार्यकर्त्यांनी आज पक्षाच्या कार्यालयासमोर जमून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्ते स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर घेऊन नाचले. भाजपला देशभरात धडा शिकविण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असुन भाजपने देशातील जनता आणि विरोधी पक्षांवर केलेल्या अन्यायाची किंमत त्यांमा मोजावी लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. (Congress workers cheered as party got majority in Karnataka assembly election)

कर्नाटक विधानसभा (Karnataka) निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. काँग्रेस (Congress) पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे पक्षाच्या (Nashik) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाने विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

Cnogress workers celebration
Ajit Pawar Politics : भुजबळ विरोधकांच्या दारी, अजित पवारांची दोन तास हजेरी!

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने बहुमताने सत्ता मिळली. जनतेच्या आशीर्वादाने सत्ता मिळवली असुन हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये कर्नाटकात भ्रष्टाचाराने हैरान झालेल्या भाजपच्या राजवटीला लोकांनी साफ नाकारले. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, धर्माधर्मांमध्ये तडा निर्माण करण्याचं काम या सर्व गोष्टीला कर्नाटक राज्यातील मतदारांनी नाकारले आहे.

यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड म्हणाले, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच कर्नाटकातील सर्व काँग्रेस नेत्यांचे मनापासून अभिनंदन. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळेच राज्यातील जनतेने त्यांना प्रतिसाद देत मतांचा पाऊस पाडला. आगामी काळात काँग्रेस पक्षराज्यातील जनतेसाठी उत्तम प्रशासन देऊन राज्याचा विकास करतील यात तीळमात्र शंका नाही. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, महिला आघाडीच्या वत्सलाताई खैरे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, राजेंद्र बागुल, सुफी जीन, आशाताई तडवी, बबलु खैरे, स्वाती जाधव, हनीफ बशीर, आण्णा मोरे, रफीक तडवी, ज्ञानेश्वर काळे, इसाक कुरैशी, जावेद इब्राहीम, मीराताई साबळे, कुसुम चव्हाण, शब्बीर पठाण यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Cnogress workers celebration
Karnataka Election Result : केवळ चार महिन्यात भाजपने गमावलं दुसरं मोठं राज्य; कुणाकडे किती राज्ये राहिली?

हनुमान पूजन केले

कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आल्याचा विजयोत्सव साजरा करताना सिन्नर फाटा येथील महाबली हनुमंतांची पूजा करून व मिठाई वाटून शहर काँग्रेस सेवा दलाने आनंद साजरा केला. याप्रसंगी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे, उपाध्यक्ष उमेश चव्हाण, लहू जाधव, संतोष हिवाळे, सिराज खान, दीपक धवर, बाळासाहेब आहेर, राजेंद्र बनसोडे, संजय पवार आदी उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com