
नाशिक : कॉंग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध ईडी (ED) कडून सुरु असलेल्या कारवाईने नाशिक काँग्रेसचे नेते आज रस्त्यावर उतरले. त्यांनी जोरदार निदर्शने केली. येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीच्या धास्तीने मोदी (Narendra Modi) प्रचंड घाबरलेले आहेत. त्यामुळेच ते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Congress agitation against Modi government at Nashik)
आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकार विरोधात पदाधिकाऱ्यांनी 'राहुल गांधी ‘संघर्ष करो है, तुम्हारे साथ है', 'नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी चलेगी', मोदी जब जब डरता है, ईडी को आगे करता है', अशी जोरदार घोषणाबाजी केली.
'राहुल गांधी ‘संघर्ष करो है, तुम्हारे साथ है', 'नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी चलेगी', मोदी हमसे डरता है, ईडीको आगे करता है', या जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमला.
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात गेले तीन दिवस चौकशी सुरु केली आहे. या सुडबुद्धीच्या कारवाईने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
दरम्यान आंदोलनावेळी केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. येणाऱ्या काळात त्यांना जनता निश्चित उत्तर देईल, असे काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहेर म्हणाले.
सूडबुद्धीच राजकारण : बच्छाव
जिल्हा, शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन केले. गांधी कुटुंबियांविरोधात जी कारवाई करण्यात येत आहे, ही दादागिरी आहे. पदाचा व सत्तेचा दुरुपयोग असल्याची भावना माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव यांनी सांगितले. खासदार राहुल गांधी यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे संपूर्ण देशातील कार्यकर्ते पेटून उठले आहेत. भाजपने सूडबुद्धीने हे काम सुरू केले आहे. कश्मीर ते कन्याकुमारी या पदयात्रेमुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभव दिसत आहे. म्हणून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.