मुंबई महापालिकेतील स्वबळासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा कानमंत्र!

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे शिबिर झाले.
Congress leader Prithviraj Chavan
Congress leader Prithviraj ChavanSarkarnama

नाशिक : मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीत काँग्रेस (Congress) स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी पक्षविस्तार व जनमानस अनुकुल आहे. त्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी विजयासाठी निश्चय करावा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithwiraj Chavan) यांनी केले.

Congress leader Prithviraj Chavan
आदित्य ठाकरेंच्या धडाडीच्या निर्णयाने वाचला २०० वर्षे जुना वटवृक्ष!

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसदर्भात इगतपुरी येथे कालपासून सुरु असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

ते म्हणाले, मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याबाबत जनतेच्या सर्वाधिक अपेक्षा व राजकीय दबाव काँग्रेस पक्षावरच आहे. या निवडणुकांना सामोरे जाताना आपल्याला मुंबई शहराचा सर्वसमावेशक चेहरा, सामान्यांचा विकास आणि पक्षाची विचारसरणी यांचा मेळ घालावा लागेल. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तत्पर व्हावे. आपल्याला एकमेकांच्या उणीवा काढणे, दोष शोधणे यावर नव्हे तर भाजपला पराभूत करण्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. त्यातून आगामी काळात आपण नक्कीच एक चांगला पर्याय देऊ.

Congress leader Prithviraj Chavan
आमचे स्वकीय, विरोधकांनी राजकीय नैतिकता गुंडाळून ठेवली?

ते म्हणाले, संविधान आणि लोकशाही हा देशाचा आत्मा आहे. आज जे सत्तेत आहेत, त्यांच्याकडून या विचारावरच घाला घालण्याचे काम सुरु आहे. आपल्याला देशातील लोकशाही, संविधान वाटवायचे आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. बेरोजगारी वाढली आहे. विविध आघाड्यांवर देशाची पिछेहाट झाली आहे. यामध्ये मोदी पूर्णतः अपयशी झाले असून ते केवळ भाषणबाजी करीत आहे. भाषणबाजी करायची व निवडणुका जिंकायचा हा पहात रहावीत त्यांचा फंडा आहे. देशाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. याची लोकांना जाणीव झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीत लोकांना पर्याय हवा आहे. काँग्रेस निश्चितच या निवडणुका जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. ते केवळ काँग्रेस पक्ष रोखू शकतो. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठीच आपण महाविकास आघाडीत सहभागी झालो. सत्ता हुकली याची मोठी खंत भाजपला आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांचे काम अतिशय चांगले सुरु आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील रोज भाजप कधी सत्तेवर येतो याची स्वप्न पहात आहेत. अशी स्वप्न त्यांनी पहात रहावीत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com