Nashik Graduate constituency : काँग्रेस उपाध्यक्ष उल्हास पाटलांची कन्या सत्यजीत तांब्याच्या प्रचारात; आता नाना पटोले काय करणार?

Satyajeet Tambe : जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
Ketaki Patil, Satyajeet Tambe
Ketaki Patil, Satyajeet TambeSarkarnama

Nashik Graduate constituency : काँग्रेस पक्षात बंडखोरी करून सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून (Nashik Graduate constituency) अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. या कृत्यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे.

असे असतानाही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे मुले तांबे यांच्या प्रचारात उघडपणे दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) संबंधितांबाबत काय भूमिक घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

जळगावचे माजी खासदार व काँग्रेस पक्षचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) यांची कन्या डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) या तांबे यांच्या प्रचार व्यासपीठावर दिसून आल्या. डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेस पक्षाचे कट्टर मानले जातात. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा नवीन तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

Ketaki Patil, Satyajeet Tambe
Thackeray At Thane : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सावली बनले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड!

नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे याना उमेदवारी जाहीर करून काँग्रेसने त्यांना 'ए-बी फॉर्म' दिला होता. त्यांनी मात्र उमेदवारी अर्ज न भरता चिरंजीव सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी आपण पाठिंबा देण्यासाठी भाजपकडे जाऊ, असे जाहीरपणे सांगितले होते.

तांबे पिता-पुत्राच्या या पवित्र्यानंतर काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) व सत्यजीत तांबे यांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत राहील हे निश्चित झाले. प्रतक्षात मात्र चित्र वेगळेच दिसत आहे.

Ketaki Patil, Satyajeet Tambe
Uddhav Thackeray : ''महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरूणाखाली जे लांडगे...''; ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका

सध्या सत्यजित तांबे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात प्रचार करीत आहेत. त्यांनी जिथे मेळावे घेतले त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मुले व्यासपीठावर दिसून येत आहेत. तांबे यांनी आज जळगाव येथे लेवा भवन येथे प्रचार मेळावा घेतला. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील व्यासपीठावर होत्या.

गेल्या दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) डॉ. उल्हास पाटील याना भेटून आशीर्वाद घेऊन गेल्या आहेत. आता त्याच डॉ. पाटील यांच्या कन्या तांबे यांच्या व्यसपीठावर कशा काय, याबाबत चर्चांना उधान आले आहे.

तांबे याना भाजपने जाहीर पाठिंबा दिला नसला तरी त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उमेदवारीच्या पाठीमागे भाजप असल्याचीही चर्चा आहे. असे असताना डॉ. केतकी पाटील यांचा प्रचारात सहभाग म्हणजे जिल्ह्यातील वेगळ्या राजकीय गणिताची नांदी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Ketaki Patil, Satyajeet Tambe
MNS News : "आव्हाड, मुंब्र्याच्या कुठल्या बिळात लपून बसलेत ?" ; 'पठाण' वरुन मनसेचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र

याबाबत थेट डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी केतकी पाटील म्हणाल्या, "तांबे परिवाराशी आमचे राजकारणापलिकडे संबंध आहेत. या जिव्हाळ्याचा संबंधामुळे आपण प्रचार मेळाव्यास उपस्थित राहिले. बाकी यात कोणतेही राजकारण नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com