Congress: विधानपरिषदेचे विरोध पक्षनेतेपद न मिळाल्याने कॉंग्रेसची नाराजी

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेस आग्रही, आज मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत होणार चर्चा.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

रावेर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद (Opposition leader) काँग्रेसला (Congress) न मिळाल्याने काँग्रेसची नाराजी असल्याची कबुली पक्षाचे विधिमंडळ नेते आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज येथे दिली. शिवसेनेचे (Shivsena) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. (Mahavikas Front not have concordance on MLC Opporiyion leader post)

Balasaheb Thorat
Congress: देशाचा खरा इतिहास पुसू देऊ नका!

विवरा (ता. रावेर) येथे काँग्रेसच्यावतीने बुधवारी आयोजित आजादी गौरव पदयात्रा कार्यक्रमानंतर श्री. थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. थोरात म्हणाले, की विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आजही आग्रही आहे. हे पद आम्हाला मिळायला हवे. कारण विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे अजित पवार यांच्याकडे आहे तर विधान परिषदेतील उपसभापतिपद शिवसेनेकडे आहे. विधान परिषदेत आमचे संख्याबळ जवळपास सारखे असल्याने हे पद काँग्रेसला देणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते.

Balasaheb Thorat
Shivsena : विरोधी पक्षनेते झाल्यानंतर दानवेंची बंडखोर बोरनारेंच्या मतदारसंघातून एन्ट्री..

याबाबत महाविकास आघाडीची गुरुवारी मुंबईत बैठक होत असून काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण बैठकीत सहभागी होणार आहेत. शक्य असल्यास मी देखील मुंबई पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. हे विरोधी पक्षनेते पद जाहीर करताना शिवसेनेने काँग्रेसला विचारले नाही, हे दुर्दैव आहे आणि आमचा त्यावर आक्षेपही आहे.

जर आम्ही मित्र आहोत, एकत्र काम करीत आहोत, आमची महाविकास आघाडी आहे तर तीनही पक्षांनी एकमेकांशी बोलले पाहिजे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com