नाना पटोलेंचे पुन्हा वाद्‌ग्रस्त विधान : ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’!

गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहेत. त्यांची कशी हालत झाली आहे, हे सर्वांनी पाहिलेले आहे. हसतात लोक भाजपवाल्यांवर.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

नाशिक : काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी काही दिवसांपूर्वी ‘आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो,’ असे वाद्‌ग्रस्त विधान केले होते. त्यावर राज्यात भाजपकडून रान पेटविण्यात आले होते. त्याचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच नानांनी आज (ता. २३ जानेवारी) पुन्हा नाशिकमध्ये तसेच वक्तव्य केले आहे. ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’, असे त्यांनी म्हटले आहे, त्यावरून पुन्हा एकदा नवा वाद उद्‌भवण्याची चिन्हे आहेत. (Congress State President Nana Patole again made a controversial statement)

नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी आल्यानंतर पटोले बोलत होते. ते म्हणाले की, देशाचे मूळ मुद्दे बाजूला सारले जात आहेत. बेरोजगारांचा देश म्हणून आपली जगाच्या पाठीवर ओळख झाली आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांचे प्रश्न वाढत चालले आहेत. केंद्र सरकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Nana Patole
हा तुला शेवटचा चान्स, उपसरपंचपदाचा राजीनामा दे; नाहीतर...

हायकमांडनी झापल्यानंतर नाना पटोले यांनी गावगुंड मोदी समोर आणला, असा आरोप भाजपचे आमदार चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केला होता. त्यावर पटोले म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहेत. त्यांची कशी हालत झाली आहे, हे सर्वांनी पाहिलेले आहे. हसतात लोक भाजपवाल्यांवर. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं, असं झाल्यानंतर आणखी काय बाकी राहिले आहे. आता या विषयांपेक्षा मी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जसे की महागाई, बेरोजगारी, शेतकरी व छोट्या उद्योजक, तसेच गोरगरिबांचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिले आहे. त्याच्यावर बोलले पाहिजे.

Nana Patole
अजित पवारांसमोर मास्क न घालता गेले की बड्या नेत्यांचीही चंपी झालीच म्हणून समजा!

मोदींना मारण्यासाठी नाना पटोले वेगवेगळ्या टीम तयार करत आहेत, या प्रश्नावर पटोले म्हणाले की, आम्ही महात्मा गांधीजींच्या विचाराचे लोक आहोत. त्यामुळे असे विचार कधीही काँग्रेसच्या मनात येऊ शकत नाहीत. हे विचार फक्त त्यांच्याकडेच येऊ शकतात. खासदार अमोल कोल्हे यांची चित्रपटातील भूमिका वादाची ठरली आहे. काँग्रेसचे महात्मा गांधींवर खरे प्रेम असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे, त्यावर काहीसे चिडत पटोले म्हणाले की, बावन्नकुळे कोण आहेत, त्यांना मी ओळखत नाही.

Nana Patole
गृहमंत्र्यांना अटक होऊ शकते! मुख्यमंत्री केजरीवालांनीच केला गौप्यस्फोट

सत्ता गेल्यापासून भाजप विचलित झाला आहे. पाण्याबाहेर पडलेला मासा जसा तडपडतो, तशी भाजपची अवस्था महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे सरकार बरखास्तीची घोषणा भाजपच्या नेत्यांनी अनेकदा केल्या आहेत. तसेच, राज्यपालांकडेही मागणी केलेली आहे. खरं तर केंद्रातील सरकार बरखास्त करायला पाहिजे. कारण देश विकणारे, रिझर्व्ह बॅंकेचा राखीव निधी लुटणारे केंद्रात भाजपचे सरकार आहे, ते बरखास्त करण्याची मागणी भाजपच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षाने करावी, असे आव्हान पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com