Congress delegation
Congress delegationSarkarnama

Congress News; बोलघेवडेपणा नको, बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करा!

कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर काँग्रेसने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा दिला

नाशिक : (Nashik) गेले दोन आठवडे कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) अक्षरशः टाहो फोडतो आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष, भाजीपाल्यासह सर्व शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मात्र सरकारचे (Eknath Shinde) नेते माध्यमांतून घोषणा करीत आहेत. ही चेष्टा थांबवून थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेस (Congress) सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर (Vasant Thakur) यांनी दिला आहे. (Congress deemands direct relief for onion growers of Nashik & Maharashtra)

Congress delegation
Jayant Patil; धक्कादायक, परिचारीकांकडून दोनशे कोटी गोळा केले?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीच्या केवळ घोषणा होत आहे. प्रत्यक्ष काहीही मदत झालेली नाही. नाफेडने अद्याप व्यापक प्रमाणात कांदा खरेदी देखील सुरु केलेली नाही. याबाबत चांदवड येथे काँग्रेसने उपोषण केले होते. त्यावेळी मदतीची घोषणा प्रशासनाने केली होती.

यासंदर्भात काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे. त्याची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आली. या निवेदनात कांदा तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जे नुकसान झाले, त्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी करण्यात आली.

Congress delegation
Onion Farmers: कांदा प्रश्नावर आक्रमक `राष्ट्रवादी` नेते उतरणार रस्त्यावर!

श्री. ठाकुर म्हणाले, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या कष्टकरी, शेतकऱ्यांचे पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले. सोंगणीला आलेला द्राक्ष, हरभरा, गहू, कांदा, डाळिंब आदी भाजीपाल्याच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

या परिस्थितीत शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर जाऊन धीर देणे आवश्यक आहे. त्याला त्वरित आर्थिक मदत देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये एकीकडे महागाईनेग्रस्त झालेल्या शेतकरी राजाला अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत मायबाप सरकारने केवळ कागदावर घोषणा व मदतीचा देखावा न करता त्वरित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला आर्थिक मदत देण्याची आज गरज आहे.

Congress delegation
Nashik News: विमानसेवेसाठी आदित्य ठाकरे यांनी घेतला पुढाकार!

यावेळी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना सरसकट त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलातर्फे करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष डॉ ठाकूर, धोंडीराम बोडके, मुकेश द्विवेदी, जगदीश वर्मा, एजाज सय्यद, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, लहू जाधव, संतोष हिवाळे, दत्ता कासार, मिलिंद वाबळे, रोहन भोईर, समाधान आहेर, विजय परदेशी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com