सेवादल म्हणते आता रेशन दुकानातून रॉकेल, साखर द्या!

नाशिकच्या तहसीलदार राजश्री आहिरराव यांना शहर काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
Congress Sevadal Office bearers
Congress Sevadal Office bearersSarkarnama

नाशिक : महागाई एव्हढी वाढली आहे की, सामान्य जनतेला जगने मुश्कील झाले आहे. अगदी मध्यमवर्गीयांना (Middle class) त्याचा झळा बसत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून (Fair price shop) पूर्वीप्रमाणे लाभार्थ्यांना रॉकेल आणि साखर मिळावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस (Congress) सेवादलातर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले.

Congress Sevadal Office bearers
दीपक पांडेंची माफी की महसूल अधिकारी माघार घेणार?

गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानाची काही वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे. गहू, तांदूळ देण्याचे प्रमाण तर कमी झालेच आहे. साखर, रॉकेल, तेल वस्तू मिळतच नाही. महागाईच्या युगात स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या धान्य, रॉकेल, साखरेची आवश्यकता आहे. तसे होणे तर दूर रॉकेल, साखर मिळतच नाही. गॅसचे दर सुमारे एक हजारांवर वाढले आहे. त्यावरील सबसिडी बंद झाली आहे. खासगी दुकानातून चढ्या दराने साखर खरेदी करावी लागत असल्याने साखरेचा गोडवा हरवला आहे.

Congress Sevadal Office bearers
भाजप नगरसेविकेच्या पतीकडे १५ लाखांची खंडणी मागितली

नागरिकांना गॅसचे दर वाढल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. पूर्वीप्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून रॉकेल, साखर, तेल सवलतीच्या दरात उपलब्ध करावे. जेणेकरून गोरगरिबांनादेखील जीवन जगणे सोयीचे होईल, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवादलातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातदेखील निवेदनाची प्रत पाठविण्यात येऊन स्वस्त धान्य दुकानातून रॉकेल, साखर यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा सवलतीच्या दरात पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या वेळी काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, माजी परदेशी, विजय पाटील, संतोष ठाकूर, सोमनाथ मोहिते, कैलास कडलक आदी. उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com