काँग्रेस म्हणते, हिंदुत्व आमच्या मनात पण महागाईचे काय ते बोला!

काँग्रेसतर्फे धुळे येथे महागाईप्रश्‍नी भोंगा आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस म्हणते, हिंदुत्व आमच्या मनात पण महागाईचे काय ते बोला!
Congress agitation at DhuleSarkarnama

धुळे : हिंदुत्व (Hindutwa) प्रत्येकाच्या मनात आहे. पण भाजप (BJP) त्याची राजकीय ढाल करून युवक व समाजाची दिशाभूल करीत आहे. महागाईने (Inflation) सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातून जनतेची ओरड सुरु आहे. त्याकडे दुर्लक्ष करायचे, आपल्या ढिसाळ कारभाराला झाकण्यासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा हे थांबवा असा इशारा काँग्रेसचे (Congress) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी दिला.

Congress agitation at Dhule
नितीन गडकरींनी जळगाव महापालिकेची बेअब्रु का केली?

सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वाढत्या महागाई विरोधात भोंगा वाजवून महागाई जुमला आंदोलन करण्यात आले.

Congress agitation at Dhule
राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांचा अल्टीमेटम मागे घेतील?

यावेळी महागाई, पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. महागाईच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी देशात जातीयतेचे आणि भोंग्याचे राजकारण सुरु आहे. राज्यात आणि देशात हिंदुत्वाचा आणि हनुमान चालिसाच प्रश्‍न विरोधी पक्ष पुढे करतोय. हनुमान चालिसा आणि हिंदुत्व आमच्या मनात, हृदयात आहे त्याचे आम्ही कधीही रस्त्यावर उतरून राजकारण केले नसल्याचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी विरोधकांना सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांच्या ध्वनिफीत काँग्रेसकडून वाजविण्यात आल्या. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने खते,बी-बियाणे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आणि याचा सर्व भार शेतकरी,सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडत आहे. म्हणून येत्या काही दिवसात गगनाला भिडलेली महागाई कमी केली नाही तर जनता भाजपचे केंद्रातील सरकार उलथविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी दिला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, जिल्हा सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साबीर शेठ आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.