शिवसेनेला धक्का; गुलाबराव पाटलांच्या मेहनतीवर काँग्रेसने फेरले पाणी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे
Gulabrao Patil
Gulabrao Patil sarkarnama

जळगाव : भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष असून आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेसने जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) सर्व पक्षीय पॅनलमधून माघार घेत धक्का दिला आहे. मात्र, भाजप वगळून महाविकास आघाडी करण्यास आमची तयारी आहे. अन्यथा आम्ही स्वबळावर लढू असा इशारा, काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनल तयार केले होते. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचा समावेश असलेली समितीही निश्‍चित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्यासह, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात या समितीची बैठक होऊन भाजप ७, राष्ट्रवादी ७, शिवसेना ५ आणि काँग्रेस २ असे जागावाटप ठरले होते. या जागा वाटपाला अंतीम स्वरूप मिळत नाही, तोच जिल्हा काँग्रेसने पुन्हा एकदा कोलांटउडी घेत स्वबळाचा नारा दिला आहे.

Gulabrao Patil
जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला धक्का, १३ नगरसेवक स्वगृही

जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही

पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले, कि जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. यात जे जागा वाटप झाले. त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती पालकमंत्र्यांकडून देण्यात आली नाही. आम्हाला बातम्यांच्या आधारे या जागा वाटपाची माहिती मिळाली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातही हेच सुत्र कायम ठेऊन जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून पॅनल होत, असेल तर आमची तयारी आहे. जातीयवादी असलेल्या भाजपसोबत आम्ही जाणार नाही. सत्ताधारी मित्रपक्षांना आम्ही विनंती करणार असुन विनंती मान्य न झाल्यास आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढु, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेमुळे जळगाव जिल्हा बँकेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सर्वपक्षीय पॅनल आता होणार नाही, मात्र शिवसेना, काँग्रस व राष्ट्रवादी काँग्रेस याचे महाविकास आघाडी पॅनल होणार कि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाणार याकडेच आता लक्ष असणार आहे.

Gulabrao Patil
खतगावकर समर्थकाच्या माघारीने साबणेंचा जीव भांड्यात; आता बारा उमेदवार रिंगणात

या वेळी पत्रकार परिषदेस जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष पाटील, एरंडोल विधानसभा अध्यक्ष इमरान मुश्ताक, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, चाळीसगाव आबासाहेब निकम, पारोळा तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, भडगाव शहराध्यक्ष दिलीप शेंडे, बोदवडचे दिलीप पाटील, मुक्ताईनगरचे डॉ. जगदीश पाटील, पाचोराचे सचीन सोमवंशी, मनोज सोनवणे, ज्ञानेश्‍वर कोळी, उध्दव वाणी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com