काँग्रेसच्या पदासाठी झगडणारे म्हणतात, `शहराध्यक्षपद नको रे बाप्पा`

काँग्रेस शहराध्यक्षपदाचा तिढा कधी सुटणार याचीच सध्या नेत्यांमध्ये उत्सुकता
काँग्रेसच्या पदासाठी झगडणारे म्हणतात, `शहराध्यक्षपद नको रे बाप्पा`
Congress Party symbolSarkarnama

नाशिक : केंद्राबरोबरच राज्यातही दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा तिढा अद्यापही सुटण्यास तयार नाही. सगळ्यांचाच ‘एकला चलो’ चा नारा आहे. त्यामुळे काँग्रेस शहराध्यक्षपदाचा (Nashik) हा काटेरी मुकुट महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वीकारायला पक्षातील वजनदार व धुरंधर नेते तयार नसल्याने नवीन शहराध्यक्षाच्या नावाबाबत मोठी उत्सुकता आहे.

Congress Party symbol
अमित देशमुखांच्या आशीर्वादाने राज्याच्या सीमेवर सर्वात मोठा जुगाराचा अड्डा?

नुकतेच पक्षात प्रवेश केलेले अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा हे शहराध्यक्ष होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनाही गटबाजीतून विरोध होत आहे. त्यांच्यासह महापालिका गटनेते शाहू खैरे, सेवादलाचे डॉ. वसंत ठाकूर, माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे, नगरसेवक राहुल दिवे, राजेंद्र बागूल यांची नावे चर्चेत असले तरी गत सात वर्षांपासून पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष राहिलेल्या शरद आहेर यांची प्रदेश पातळीवर उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

Congress Party symbol
शिवसेना, भाजपच्या वादात छगन भुजबळ काढणार तोडगा!

या निवडीनंतर पक्षात एकमत होत नसल्याने प्रभारी शहराध्यक्षपदाचा भारही त्यांच्याकडेच आहे. मध्यंतरी त्या पदासाठी गुरमित बग्गा यांच्या नावाची जोरदार चर्चाही होती. परंतु, त्यांना पक्षातील अनेकांनी विरोध केल्याने ही निवड लांबणीवर पडली, हा तिढा अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे या पदावर निवडीसाठी श्री. बग्गा यांनी मनपा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. महापालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या गोटात अद्यापही शांतताच आहे.

त्यातच शहराध्यक्षपदाचा तिढा अद्यापही सुटायला तयार नसल्याने त्याचा फटका पक्षाला बसू शकतो, अशीही शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे इतर पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना काँग्रेस शहराध्यक्षपदाचा तिढा अद्यापही सुटण्यास तयार नाही. केंद्रातील सत्ता जाऊनही या पक्षातील गट-तटाचे राजकारण असेच सुरू राहिले तर आज केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच नगरसेवक असलेल्या महापालिका निवडणुकीत कसे यश मिळणार, अशी खंत प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करतात.

पंचवटीत खाते खोलणार का?

सिडको, सातपूर, नाशिक रोड भागात कधीकाळी मोठा जनाधार असलेला पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख होती. परंतु, सध्या महापालिकेच्या सहा विभागात फारसा जनाधार उरलेला नाही. पक्षाचे काही नगरसेवक पक्षामुळे नव्हे तर वैयक्तिक करिष्म्यावर विजयी होत आहेत. २००२ पर्यंत पंचवटी या पक्षाचे नगरसेवक बऱ्यापैकी विजयी होत असतं. मात्र मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांत पंचवटी विभागात पक्षाच्या हाती भोपळाच लागला आहे. या वेळी तरी पंचवटी विभागात हा पक्ष खाते खोलणार का, याबाबत औत्सुक्य आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in