भाजपला जास्त मते मिळण्यामागे हे आहे कारण; सतेज पाटलांनीच सांगितले गणित

भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली.
Satej Patil
Satej Patilsarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) पोटनिवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव झाला आहे. मात्र, त्यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. त्यामुळे तीन पक्ष एकत्र येवून सुद्धा भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळाली. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत उत्तर कोल्हापूरमध्ये भाजपचा आमदार असेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. त्यावरुन काँग्रेसचे (congress) नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी यावर भाष्य करत भाजपला मिळालेल्या मतांचे गणीत मांडले.

पाटील म्हणाले, भाजपचा मतांचा टक्का वाढला, असे जर बोलले जात असेल तर भाजपने असे जाहीर करावे की त्यांना आरपीआयची, जनसुराज्य पक्ष तसेच सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची आणि शिवसंग्राम संघटनेची, त्याच बरोबर महाडिक गटाची मते मिळालेली नाहीत. अत्यंत निकाराची लढाई भाजपने लढली होती. पाच वर्षांपासून सुरू असलेली त्यांची अयशस्वी घौडदोड थांबवण्याचा त्यांनी या पोटनिवडणुकीत प्रयत्न केला होता, असे पाटील म्हणाले.

Satej Patil
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर फडणवीस म्हणाले...

मात्र, दुसऱ्या बाजूला हे कोल्हापूर शहर पुरोगामी आहे, हे दाखवून देण्याचे काम कोल्हापूरकरांनी केले आहे. आता जरी त्यांच्या मतांचा टक्का वाढला असे वरवर दिसत असले, तरी पुढच्या निवडणुकांमध्ये ती परिस्थिती राहणार नाही, असे सांगत सतेज पाटील यांनी भाजपला आव्हान दिले.

हा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. ध्रुवीकरणाचा प्रचंड प्रयत्नही कोल्हापूरमध्ये झाला. कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. समतेचा संदेश ज्यांनी जगाला दिला, त्या भूमिमध्ये ध्रुवीकरण करण्यात आले. द काश्मीर फाईल्स चित्रपटाची तिकीटे २५-३० हजार लोकाना मोफत देण्यात आली, असा आरोप पाटील यांनी केला.

Satej Patil
'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'

आम्ही सगळ्यावर मात केली, कारण तो काश्मीर फाईल्स बघायला जात असताना, ११६ रुपयांचे पेट्रोल गाडीत टाकून तो बघायला जावे लागते. ११०० रुपये मोजून घेतलेल्या सिलिंडेरवर केलेला चहा घरी प्यावा लागतो, हे आम्ही लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. महागाईचा मुद्दा देखील आम्ही प्रामुख्याने मांडला, असेही पाटील यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत भाजपने विखारी प्रचार केला. त्यांचे जवळपास ६१ आमदार कोल्हापूरात ठाण मांडून होते. ६० हजार कार्यकर्ते भाजपचे कोल्हापूरात होते, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com