काँग्रेसचे संपतराव सकाळे तिसऱ्यांदा बिनविरोध

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनवर बिनविरोध निवड झाल्याने संपतराव सकाळे यांचा सत्कार करण्यात आला.
Sampatrao Sakale
Sampatrao SakaleSarkarnama

नाशिक : काँग्रेस नेते (Congress) संपतराव सकाळे (Sampat Sakale) हे त्र्यंबकेश्वर गटातून सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी दोन सदस्यांनी माघार घेतली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणूकीत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांत उमेदवारीसाठी चढाओढ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader rajendra Bhosale) राजेंद्र भोसले, भाजपचे केदा आहेर (Bjp`s Keda Aher) आणि श्री. सकाळे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २४ नोव्हेंबरला पॅनेल जाहीर होईल. (NCP leader Rajendra Bhosale will announce panel on 24 Nov.)

Sampatrao Sakale
नितीन गडकरींची घोषणा हवेतच विरली...बऱ्हाणपूर महामार्ग नाहीच!

जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा जिल्हा संघाच्या (मजूर फेडरेशन) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी गटातून दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ज्येष्ठ संचालक संपतराव सकाळे यांची बिनविरोध निवड झाली. सकाळे यांच्या रूपाने बिनविरोधाचे पहिले खाते उघडत सकाळे यांनी दबदबा कायम ठेवला. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अंतिम घोषणा माघारीनंतर होईल. २४ नोव्हेंबरपर्यंत माघारी आहे.

Sampatrao Sakale
राज्याचे मंत्री गिरीश महाजनांना सुटेना दूध संघाच्या सत्तेचा मोह

जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी २२१ अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांची अर्जाची निवडणूक अधिकारी सुरेशगिरी महंत यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यात विविध कारणांमुळे चार अर्ज बाद झाले. याशिवाय एका जागेसाठी उमेदवारांनी तीन ते चार अर्ज दाखल केले आहेत.

आतापर्यंत तब्बल ५३ जादांचे अर्ज कमी करण्यात आले. त्यामुळे १६४ अर्ज शिल्लक आहेत. उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी (ता. १०) फेडरेशनच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. गुरुवारी माघारीच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी गटातून गणेश कोठुळे व रोहित सकाळे यांनी अर्ज मागे घेतला.

या माघारीनंतर या गटात सकाळे यांची बिनविरोध निवड झाली. संचालकपदावर सकाळे चौथ्यांदा निवडून आले. यात एकदा निवडणूक प्रक्रियेतून, तर तीनवेळा ते बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार हिरामण खोसकर, विनायक माळेकर, समाधान बोडके, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, अरुण शिंदे, बापू सकाळे, अजित सकाळे आदींनी सकाळे यांचा सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in