काँग्रेसचा मालेगावचा बालेकिल्ला ढासळला?, माजी आमदार रशीद शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर
Rashid ShaikhSarkarnama

काँग्रेसचा मालेगावचा बालेकिल्ला ढासळला?, माजी आमदार रशीद शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर

महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसला पक्षाच्या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्तेचा उपयोग होताना दिसत नाही.

मालेगाव : महाविकास आघाडीचा (Mahavikas Front) घटक असलेल्या काँग्रेसला पक्षाच्या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्तेचा उपयोग होताना दिसत नाही. महापालिका, विधानसभा यांसह विविध पदांवर सत्तेत असल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला (Congress Stronghold on Malegaon politics) असलेल्या मालेगावात पक्षाला दुसऱ्यांदा मोठा झटका बसला आहे. माजी आमदार रशीद शेख (Congress leader Rashid Shaikh Resigned) यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

Rashid Shaikh
बाजार समिती निवडणुकीत मतदान कोण करणार हे तर सांगा!

माजी आमदार रशीद शेख हे पुत्र माजी आमदार आसिफ शेख यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत. रशीद शेख यांनी बुधवारी प्रकृती अस्वस्थ व यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रियांचे कारण देत कॉंग्रेसच्या महानगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविला आहे.

Rashid Shaikh
तुकाराम मुंडेंनी वाढविलेली घरपट्टी, पाणीपट्टी शिवसेना रद्द करणार!

आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश केल्यापासून शहरात पक्ष बांधणीसाठी त्यांनी झंजावात सुरु केला आहे. बुथनिहाय १० हजाराहून अधिक क्रियाशील कार्यकर्त्यांची त्यांनी नोंदणी केली आहे. यातच कॉंग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर रशीद शेख यांनी कॉंग्रेसचला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या पत्नी ताहेरा शेख कॉंग्रेसच्या येथील महापौर असून, ते स्वत: विद्यमान सदस्य आहेत. महापालिकेत कॉंग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता आहे. शेख यांनी राजीनाम्यामागे प्रकृतीचे कारण दिले असले तरी मुळ दुखणे वेगळेच आहे. राजीनामापत्रात त्यांनी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत राहील, असे नमूद केले आहे.

कॉंग्रेसला धक्का...

माजी आमदार रशीद शेख यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर १९९९ व २००९ असे दोन वेळा आमदारकी भुषविली. २०१७ मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. तत्पुर्वी १९९४ मध्ये नगराध्यक्ष होते. यापुर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून विजयी झालेले होते. कॉंग्रेस शासन कार्यकाळात त्यांना राज्यमंत्री पद दर्जाचे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. आमदार शेख घराणे कॉंग्रेसशी एकनिष्ठ व पक्षाची जिल्ह्यातील मोठी ताकद होती.

...

Related Stories

No stories found.