Balasaheb Thorat News: बाळासाहेब थोरात यांनी नाशिककरांच्या व्यथांना वाचा फोडली!

Balasaheb Thorat Criticized Government On Nashik Traffic: नाशिकचे नेते मंत्री झाल्याने बाळासाहेब थोरात यांनी वेधले नाशिकच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

Nashik Highway Traffic Issue: नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या चार-पाच किलोमीटर लांब रांगा लागतात. वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मात्र नाशिकचे नेते सरकारमध्ये सहभागी झाल्याने या प्रश्नाकडे आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरले.

नाशिक (Nashik) मुंबई (Mumbai) महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय तीव्र बनला आहे. कालच त्यात आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांसह विविध नेते त्यात अडकले होते. त्यावर विधीमंडळात शासनाचे (Maharashtra Government) लक्ष काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasahaeb Thorat) यांनी वेधले.

Balasaheb Thorat
Satyajeet Tambe News : सत्यजीत तांबे का म्हणाले, मुंबईकरांविषयी प्रचंड आदर, ते किती सहनशील!

नाशिक- मुंबई महामार्गावर कल्याण फाटा येथे रस्ता रूंदीकरण आणि उड्डानपुलाचे काम अनेक दिवस सुरू आहे. त्याचा फटका वाहतूकीला बसतो. अनेकदा दिर्घकाळ लोक या कोंडीत अडकून पडतात. त्याबाबत तक्रारी असूनही काहीही उपाययोजना होऊ शकलेली नाही. कालच यामध्ये आमदार सत्यजीत तांबे वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यांना कल्याणहून लोकलने मुंबईला जावे लागले होते.

आमदार तांबे यांनी ही व्यथा ट्वीटरवर माडंली होती. काँग्रेस नेते आणि त्यांचे मामा थोरात यांनी ती विधानसभेच्या सभागृहात मांडली. या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर ते म्हणाले, सरकारच्या वतीने यावर ऑगष्ट २०२४ पर्यंत तोडगा निघेल, असे सांगण्यात आले.

Balasaheb Thorat
BJP tweets ON Amit Thackeray : भाजपचा सल्ला अमित ठाकरेंना पचनी पडेल का?

याबाबत थोरात म्हणाले, हा खुप मोठा कालावधी आहे. त्यावर लगेच मार्ग काढा. छगन भुजबळ तसेच अन्य नेते आता सरकारमध्ये बसले आहेत. त्यामुळे ते मौन आहेत, अन्यथा त्यांनी या विषयावर सरकारला धारेवर धरले असते. या निमित्ताने नाशिककरांची अतीशय गंभीर व्यथा थोरात यांनी सभागृहात मांडली.

थोरात म्हणाले, मी अनेकदा यात अडकलो आहे. एकदा तर जवळच माझ्या परिचीतांचे घर असल्याने दोन किलोमीटर चालत गेलो होते. आजही गुगलवर सर्च केले तर चार-पाच किलोमीटरच्या रांगा या मार्गावर असतात. त्यामुळे प्रवासात किती वेळ जाईल, या चिंतेने मनात धस्स होते.

Balasaheb Thorat
Prithviraj Chavan असे काही बोलले, Shambhuraj Desai अक्षरश: तळतळले | Shivsena | Congress | Sarkarnama

नाशिक, नगर, धुळे, जळगावला जाणाऱ्यांची खूप अडचण होते. अनेक रूग्णवाहिका देखील अडकतात. त्यात रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांची किती गैरसोय होते. यावर सरकारने कधी तरी विचार केला पाहिजे की नाही. त्यामुळ ऑगष्टपर्यंत वाट पहात बसू नका लगेच यावर लगेच उपाय करा, ऑगष्ट ही दिर्घकाळ आहे. अन्य सदस्यांनीही या चर्चेत भाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com