Thorat VS Vikhe Patil: 'निळवंडे'चे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न; थोरातांनी विखे पाटलांना सुनावलं

Balasaheb Thorat VS Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न हा नेहमीच राजकीय मुद्दा राहिला.
Balasaheb Thorat VS Radhakrishna Vikhe Patil :
Balasaheb Thorat VS Radhakrishna Vikhe Patil :Sarkarnama

Ahmednagar News : निळवंडे धरणातील पाणी कालव्यात सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 मे रोजी झाली. या कालव्याच्या माध्यमातून नगर-नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 182 गावांना मोठा फायदा होणार आहे. निळवंडे धरण आणि उजवा-डाव्या कालव्यांची कामे अनेक वर्ष रखडली होती. या निळवंडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न हा नेहमीच राजकीय मुद्दा राहिला.

आता निळवंडे धरणातील पाणी कालव्यात सोडण्याची चाचणी झाली असली तर अद्यापही राजकीय नेत्यांमध्ये श्रेय वादाच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची अप्रत्यक्ष टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर माध्यमांशी बोलताना केली.

Balasaheb Thorat VS Radhakrishna Vikhe Patil :
Akole Nilwande Dam : सरकार बदललं अन् नशिबाने 'त्यांना' कालव्यांच्या चाचणीची संधी मिळाली; थोरातांंचा शिंदे-फडणवीसांना चिमटा..

थोरात म्हणाले, "नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व्हावा, हे स्वप्न आम्ही पाहिलं होतं. आमचं स्वप्न आता पूर्ण होत आहे, याचा आनंद आहे. या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. त्यामुळे आज दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे".

"पण काही लोक निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. केवळ पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे काम त्यांनी केले असे होत नाही. जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे या प्रकल्पासाठी कोणी प्रयत्न केले. कोणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये", असा निशाणा बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांवर साधला.

Balasaheb Thorat VS Radhakrishna Vikhe Patil :
Pankaja Munde : मी माझ्या नेत्यांना भेटणार अन्...; पंकजा मुंडेंना व्यक्त केली मनातील खदखद

दरम्यान, "धरण आणि कालव्यांचे काम होत असताना अनेकांनी सोयीनुसार राजकीय भूमिका बजावल्या. आम्हीच कालवे होऊ देत नाही, असे आरोप करुन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला", असा आरोप विखे पाटलांनी याआधी थोरातांवर नाव न घेता केला होता.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com