Shrigonda Politics : विधानसभेसाठी नागवडेंचं बंड; राष्ट्रवादीच्या शेलारांनीही थोपटलं दंड; म्हणाले...

Congress Vs NCP : ''...तर अपक्षाचीही तयारी ठेवणार !''
Shrigonda Politics
Shrigonda PoliticsSarkarnama

Ahmednagar: महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे. आम्ही दोन वेळेला थांबलो. ज्यांच्यासाठी थांबलो त्यांना त्याचे काही वाटत नसले तरी यावेळी मात्र समोर कोण आहे याची पर्वा होणार नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी मागणार आहोत. कुणीही काहीही चर्चा करीत असले तरी मी आघाडीच्याच उमेदवारीसाठी आग्रही राहणार आहे. नेत्यांना काही अडचण असेल तर अपक्षाचीही तयारी ठेवणार आहे अशा शब्दांत विधानसभा ताकदीनिशी लढणार असल्याचे स्पष्ट संकेत नागवडेंनी दिले आहेत. त्याला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे(Anuradha Nagawade) यांच्या श्रीगोंदा मतदारसंघावर ठोकलेल्या दाव्यावर भाष्य केलं आहे. शेलार म्हणाले, 'श्रीगोंदा मतदारसंघ हा फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असून मी पक्षाकडून उमेदवारीचा दावेदार आहे. आपण पक्षाकडून उमेदवारी मागणार आहोत तसेच पक्षाची उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Shrigonda Politics
Balu Dhanorkar News : लोकहितासाठी आक्रमक होणारे खासदार धानोरकर कायम स्मरणात राहतील !

राष्ट्रवादी कॉंग्रेस(NCP)चे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी २०१९ ला काही वैयक्तिक कारणास्तव पक्षानं देऊ केलेली उमेदवारी नाकारली होती. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का अशाही चर्चा त्यावेळी झाल्या. मात्र, राहुल जगताप हे राष्ट्रवादी पक्षातच राहिले. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस अगोदर ऐनवेळी पक्षाने घनश्याम शेलार ( Ghanshyam Shelar) यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव होत बबनराव पाचपुते हे भाजपाच्या तिकीटावर विजयी झाले.

राष्ट्रवादीला २०१९ ला विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळत बारा विधानसभापैकी सहा विधानसभा मतदारसंघात यश मिळाले. मात्र पक्षाकडे असलेली श्रीगोंदयाची जागा गमवावी लागल्याचे शल्य दरम्यान अनेक कार्यक्रमात अजित पवार यांच्या वक्तव्यातून दिसून आले. या पार्श्वभूमीवर २०२४ ला श्रीगोंदा मतदारसंघ पुन्हा हातात घेण्यासाठी पक्ष पातळीवर वरिष्ठांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

Shrigonda Politics
Sakshi Malik On Wrestlers Protest: कुस्तीपटूंचं आंदोलन थांबणार नाही...: साक्षी मलिकचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

अशावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी सध्या सुरू केलेल्या पक्षाच्या जनसंवाद यात्रेत श्रीगोंदा(Shrigonda) विधानसभा मतदारसंघावर ठाम दावा दाखल करत प्रसंगी आघाडी किंवा पक्ष नेतृत्वाची अडचण असेल तर अपक्ष लढण्याची तयारी ठेवू असे विधान केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये या जागेसाठी रस्सीखेच होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागवडे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

शिवाजीराव बापू नागवडे हे या मतदारसंघात आमदार राहिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आजचे अनेक नेते राजकारणात पुढे आले. स्वतः बबनराव पाचपुते पण ही गोष्ट मान्य करतात. नागवडे सहकारी कारखान्याच्या निमित्ताने मतदारांचा मोठा वर्ग नागवडे यांच्या सोबत असतो. मात्र २०१४ ला विधानसभा निवडणुकीत नागवडेंना शरद पवार यांनी साखर महासंघाचा शब्द देत थांबवले आणि राहुल जगताप हे राष्ट्रवादीकडून निवडून आले.

हा सर्व इतिहास पाहता नागवडे परिवाराने 'श्रीगोंद्या'वर २०२४ साठी महाविकास आघाडी कडून उमेदवारीचा दावा स्पष्ट केल्याने पुन्हा एकदा या प्रश्नात शरद पवार(Sharad Pawar) यांनाच लक्ष घालावे लागेल असे बोललं जातंय.

Shrigonda Politics
Shinde Vs Thackeray : दसरा मेळाव्यानंतर वर्धापन दिनावरुनही राजकारण तापणार; शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच...

श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच...

२०१९ ला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणूकीपासून बाजूला होणे, त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यावेळी केलेला भाजप प्रवेश आणि पाचपुतेंचा केलेला प्रचार, नागवडे कुटुंबाने हर्षवर्धन पाटील, राम शिंदे यांच्या प्रचारात सहभाग घेतला का यावर झालेली चर्चा पाहता श्रीगोंदा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा सोडणार नसल्याचं दिसून येत आहे. याच अनुषंगाने घनश्याम अण्णा शेलार यांनी, 'श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असून आपण उमेदवारीसाठी दावेदार असल्याचे' स्पष्ट केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com