
धुळे : गोताणे (ता. धुळे) (Dhule) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीसाठी (Cooperative) झालेल्या चुरशीच्या निवडणूक लढतीत कालिका माता शेतकरी पॅनलने सर्व जागांवर विजय मिळविला. नवनिर्वाचित सेवा सोसायटी संचालकांचे प्रदेश काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या हस्ते सत्कार झाला. (Congress wins incooperative society elections in Dhule Rural)
धुळे तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणूकीत काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी सातत्याने विजय संपादन केला आहे. त्यामुळे विरोधकांना विशेषतः भाजपला त्याचा फटका बसत आहे. बहुतांश संस्थांत कांग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा विजय झाला आहे. त्यामुळे तालुक्यात काँग्रेसची आगेकुच सुरु आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, पॅनलप्रमुख बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, वसंत पाटील, डॉ. संजय पाटील, पांडुरंग पाटील, सरदार पाटील, हिंमत पाटील, चुडामण पाटील, भास्कर पाटील, विनायक पाटील, भटू पाटील, प्रताप अहिरे, हिंमत अहिरे, जगन्नाथ चव्हाण, वसंत चव्हाण, वेडू पाटील, बारकू पाटील, तुकाराम पाटील, हिलाल पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
गोताणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन पाटील, माजी सरंपच भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली गेली. विजयी उमेदवार असे : अप्पा काळू पाटील, गोरख भिका पाटील, जगन्नाथ भुरमल पाटील, दगडू सदाशिव पाटील, धुडकू कथ्थू पाटील, भगवान गणपत पाटील, महारू पुंजाराम पाटील, शिवाजी भटू पाटील, अप्पा शंकर महाजन, दगडू महाळू भिल, केवळबाई हिरालाल पाटील, सरलाबाई अर्जुन पाटील, आनंदा रामभाऊ पाटील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल यंडाईत यांनी काम पाहिले, तर त्यांना सचिव तुकाराम महाले यांनी सहकार्य केले
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.