सहकारात काँग्रेसचेच वर्चस्व, विरोधक हद्दपार!

आमदार कुणाल पाटील यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
Kunal Patil, Congress leader
Kunal Patil, Congress leaderSarkarnama

धुळे : धुळे (Dhule) तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवर (Co-operative) काँग्रेसचेच (Congress) वर्चस्व आहे. स्वार्थासाठी विरोधकांनी काही विविध कार्यकारी सोसायटयांवर निवडणूका लादल्या. मात्र तेथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला, असा दावा आमदार कुणाल पाटील यांनी केला.

Kunal Patil, Congress leader
नाशिकमध्ये ३९ मशिदींना अजानची परवानगी नाकारली!

धुळे येथील विविध सहकारी सोसायटयांच्या निवडणुकांत काँग्रेसच्या पॅनेलचा विजय झाला. या विजयी संचालकांचा सत्कार आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, जनता विकासाच्या पाठीमागे असल्याने आम्ही प्रत्येक निवडणूकीसाठी सज्ज आहोत. तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकासासाठी झटत आहे. विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये.

Kunal Patil, Congress leader
राज्यातील मशिदी आता उघडा , मौलाना यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

आमदार पाटील म्हणाले, गावागावातील विविध निवडणूक बिनविरोध झाल्या तर वाद निर्माण होणार नाहीत. म्हणून हेवेदावे, व्देष बाजूला ठेवून गावाच्या एकता व प्रगतीसाठी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे. धुळे तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संभाजी राजपूत, विनायक शिंदे, डॉ. दरबारसिंग गिरासे, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव खैरनार, माजी सभापती गुलाबराव पाटील, प्रशासक रितेश पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष कें. डी. पाटील, पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष अशोक सुडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नरडाणा सोसायटी निवडणूक बिनविरोध

नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या तेरा सदस्यपदासाठी निवडणूक बिनविरोध झाली. यंदा जिल्ह्यातील विकासोच्या ९० टक्के निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत.

सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटातून रमेश पाटील, सुनील पाटकरी, अमृत भामरे, जगन्नाथ पाटील, रमेश भामरे, राजसबाई पाटील, अशोक वाघ, शिवाजी भामरे यांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जाती व जमाती गटातून रवींद्र महाले, महिला गटातून प्रमोदिनी सिसोदे, माधुरी सिसोदे, इतर मागासवर्गीय गटातून सिध्दार्थ सिसोदे, भटक्या व विमाप्र गटातून भाऊसाहेब बोरसे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.डी.कोकणी यांनी काम पाहिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com