काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीतच माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश!

फैजपूर येथे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक शेख जफर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Congress leader joins NCP
Congress leader joins NCPSarkarnama

फैजपूर : येथील माजी नगरसेवक, कॉंग्रेसच्या (Congress) माजी नगरसेविका पुत्र तसेच रावेर विधानसभा मतदार क्षेत्राचे युवक काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्याने शहरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Congress leader joins NCP
मी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज मात्र छगन भुजबळ हे खरे वारस!

रावेर विधानसभा मतदार क्षेत्राचे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष वसीम जनाब, युवक काँग्रेसचे विधानसभा कार्याध्यक्ष मुदस्सर नजर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख जफर यांच्यासह व र्काँग्रेसच्या माजी नगरसेविका पुत्र शहबाजखान हाजी शकीलखान या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फैजपूर दौऱ्यावर आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Congress leader joins NCP
...तर राज ठाकरेंना बेड्या ठोका

यामुळे काँग्रेसला फैजपूर शहरात मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे माजी नगरसेवक शेख जफर, रावेर माजी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष शेख वसीम जनाब, माजी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मुदस्सर व शहबाजखान हाजी शकीलखान यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी बळकट होईल व आगामी नगरपालिका निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादीला याचा फायदा होईल, असे सांगितले जात आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com