काँग्रेसने उधळले, एकनाथ खडसे- गिरीश महाजनांचे राजकीय इमले

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला किमान पाच जागा मिळाल्या तरच महाविकास आघाडीत राहणार.
काँग्रेसने उधळले, एकनाथ खडसे- गिरीश महाजनांचे राजकीय इमले
Shirish Choudhary, Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

रावेर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Jalgaon District bank election) संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला किमान पाच जागा (Congress deemands atleast 5 seats) मिळाल्यास महाविकास आघाडीत राहू; अन्यथा ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवू. (Otherwise face election indipendent) मात्र, कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा समावेश असलेल्या पॅनलमध्ये जाणार नाही, अशी माहिती आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Choudhary) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Shirish Choudhary, Girish Mahajan & Eknath Khadse
पांडेजी म्हणतात, `नो हेल्मेट, नो पेट्रोल` नंतर नाशिकमध्ये `नो होर्डिंग`

त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन आपले राजकीय वैर विसरून जिल्हा बॅंकेच्या सत्तेच्या इमल्यासाठी एकत्र येणार होते. त्याची सर्व तयारी देखील झाली होती. मात्र त्यात शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांसह सर्वांनीच काँग्रेसला नगण्य लेखत केवळ एक जागा देण्याची तयारी दाखवली होती. आता काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेने त्यांचे राजकीय इमले उधळले गेले आहेत.

Shirish Choudhary, Girish Mahajan & Eknath Khadse
जयंत पाटील यांचे मराठवाड्याला १९.२९ टीएमसी पाण्याचे गिफ्ट!

आमदार चौधरी म्हणाले, की बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपसोबत काँग्रेस या निवडणुकीसाठी पॅनलमध्ये येणार नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित येऊन पॅनल तयार करावे, अशी अपेक्षा आहे. त्यात काँग्रेसला रावेर, यावल आणि चोपडा येथील संस्था मतदारसंघातील तीन जागा आणि जिल्हास्तरीय जागांमधील दोन अशा किमान पाच जागा मिळाल्या, तरच महाविकास आघाडीच्या पॅनलचा विचार करता येईल; अन्यथा काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यास सक्षम असून, स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविण्याबाबत पक्षाचा आदेश आल्यास स्वतंत्र पॅनल उभे केले जाईल.

दरम्यान, रावेर तालुक्यातून विकास संस्था मतदारसंघातून माजी आमदार अरुण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल विचारले असता आमदार चौधरी म्हणाले, की माजी आमदार पाटील यांच्याबद्दल आपल्याला व्यक्तिगत आदर आहे. महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली, तर आम्ही प्रामाणिकपणे पॅनलच्या मागे ठामपणे उभे राहू. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून पक्ष अंतिम निर्णय घेईल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in