गुलाबरावांच्या लग्नघरी भाजप, शिवसेना अन् काँग्रेसची रंगली हास्यमैफल

शिवसेना नेते आणि गुलबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्न समारंभात रंगली मैफल
Leaders in Jalgaon at marrige
Leaders in Jalgaon at marrigeSarkarnama

जळगाव ; राजकारणात सतत विविध डावपेच, आडाखे आणि प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करणारे वाकबाण सोडणारे नेते आपण नेहेमीच पाहतो. तो त्यांच्या राजकारणाचा भाग असतो. मात्र प्रत्यक्षात समोरासमोर आल्यावर हे वाकबाण अगदीच गुदगुल्या करणारे फुलेहोऊन जातात, हा अनुभव नवा नाही.

Leaders in Jalgaon at marrige
अजब निर्णय...लाच घेतली शिपायाने, शिक्षा झाली पोलिस निरीक्षकाला!

अनेकदा असा अनुभव येतोच. जळगावला पालकमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या लग्नघरी देखील त्याचा प्रत्यय आला. रोजच एकमेकांवर बाण चालविणाऱ्या शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमी एकमेकांशी बास्यविनोद करीत गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही मैफल चांगलीचरंगली. त्यामुळे त्यांच्या अनुयायी, उपस्थित सगळ्यांनाच त्याचे अप्रुप वाटले नसते तरच नवल.

Leaders in Jalgaon at marrige
राज्यात उद्या शाळा उघडणार...नाशिक शहरात शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर

शिवसेना नेते आणि गुलबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्न समारंभात सबंध जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते, नागरिक आणि सर्वच पक्षाचे अनुयायी झाडून हजर होते. त्यात लोकप्रतिनिधी होते तसे नेतेही होते. इथे राजकारणाचा विषय नसल्याने नेत्यांनी एकमेकच्या गाठीभेटी घेत हाल हवाल घेतला. त्यात वातावरण व तणाव हलका करण्यासाठी चांगलीच मदत झाली.

समारंभ व इतर कार्यक्रमात एरव्ही देखील सत्ताधारी, वि रोधक एकमेकाशी हितगुज करतातच. यावेळीही एक दुसऱ्याला टोमणे मारून त्यांनी विनोद केले. हास्यविनोद करताना भाजप, शिवसेना व काँग्रेसचे नेते चांगलेच रमले. या विवाह सोहळ्यात राज्याचे आजी, माजी मंत्री, सर्व पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन, राज्याचे महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब आणि शिवसेनेचे नेते व माजी आमदार सचिन आहेर यांच्यात हास्यविनोदाची मैफल रंगली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in