काँग्रेसचे आंदोलन म्हणजे, पक्ष विसर्जनाचा महोत्सव आहे

भाजपचे शहर, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली.
काँग्रेसचे आंदोलन म्हणजे, पक्ष विसर्जनाचा महोत्सव आहे
Anup AgarwalSarkarnama

धुळे : ईडीची (ED) नोटीस मिळताच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बचावासाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन म्हणजे काँग्रेसच्या (Congress) विसर्जनाचा महोत्सव आहे, यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी जनतेस वेठीस धरण्याचा काँग्रेसचा हा उद्योग आहे अशी टीका भाजपचे (BJP) शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल (Anup Agarawal) यांनी केली. (Congress agitaion will immersion there party)

Anup Agarwal
काँग्रेस नेता आता पेटलाय... मंत्री धडकले राजभवनावर

पाच हजार देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी जमा केलेल्या पैशातून स्थापन करण्यात आलेल्या ‘असोसिएटेड जर्नल’द्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्रासाठी देशात विविध ठिकाणी मिळालेली सुमारे दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी गांधी परिवाराने यंग इंडियन्स नावाची कंपनी स्थापन करून केवळ ५० लाखांत ही राष्ट्रीय संपत्ती हडप केल्याचा आरोप आहे.

Anup Agarwal
केंद्र सरकार अजित पवारांना एव्हढे का घाबरले?

या प्रकरणी सुनावणीसाठी राहुल गांधी यांना ‘ईडी’ने बोलावताच गांधी परिवाराचे भ्रष्ट रूप जाहीर होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यंत्रणांवर दबाव आणण्याकरिता सत्याग्रह आंदोलन सुरू करून जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग चालविला असल्याचे श्री. अग्रवाल यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचारी गांधी परिवाराची मर्जी सांभाळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून यासाठी देशाला वेठीस धरण्याचा काँग्रेसचा डाव हाणून पाडला जाईल. केवळ गांधी परिवारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या काँग्रेसजनांना असत्य आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करण्यातच अधिक रस असल्याचे यातून स्पष्ट झाले असून काँग्रेसने स्वतःच आपल्या विसर्जनाचा उत्सव सुरू केल्याची टीका श्री. अग्रवाल यांनी केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in