Mahavikas Aghadi News; केवळ सहानुभूती शुभांगी पाटील यांना विजयी करेल का?

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांएव्हढीच मतदारांचीही कसोटी.
Satyajeet Tambe- Shubhangi Patil
Satyajeet Tambe- Shubhangi PatilSarkarnama

नाशिक : (Nashik) पदवीधर मतदारसंघातील (Graduate constituency) प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. ३०) मतदान होत आहे. त्यात मतपत्रीकेवर सोळा उमेदवार आहेत. मात्र मुख्य लढत अपक्ष व तयारीनीशी उतरलेले सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व शिवसेनेने (Shivsena) प्रतिष्ठेच्या केलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात आहे. तांबे यांच्याविषयी मतदारांचा गोंधळ जेव्हढा वाढेल, तेव्हढी शुभांगी पाटील यांच्याविषयी सहानुभूती वाढेल. ही निवडणूक एका अर्थाने मतदारांचीही परिक्षा घेणारी असेल. (Graduate Constituency Elecation may be the test of voters)

Satyajeet Tambe- Shubhangi Patil
NCP News; हिंदू-मुस्लीम व सुवासिनी- विधवांसह आगळा वेगळे हळदी कुंकू!

या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नवे राजकीय वळण मिळाले. त्यात काँग्रेसने दोन कोरे एबी फॉर्म पाठवल्याचा दावा केला, मात्र विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत आपण भाजप, मनसे यांसह सर्वांचा पाठींबा मागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जो गोंधळ उडाला, त्यात काँग्रेसची पुरती शोभा झाली. तांबे भाजपचे की कोणाचे हा गोंधळ निर्माण झाला. तो शेवटपर्यंत कायम राहिला. भाजपने उमेदवार दिला नसल्याने तांबे यांच्यामागे `हात` कोणाचा याने मतदारांत गोंधळ झाला. तो अद्याप कायम आहे. या सगळ्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पुर्णतः अलिप्त आहेत. त्यांचे काहीही विधान आलेले नाही, हे सुचक आहे.

Satyajeet Tambe- Shubhangi Patil
Dhule News; माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यावर जमीन खरेदी- विक्रीत हेराफेरीचा गुन्हा?

यावर नेहेमीप्रमाणे थंड करून खाणाऱ्या अन् निर्णय कोणी घ्यायचा याबाबतच्या गोंधळात काँग्रेस तीन-चार दिवस घुरफटली. शिवसेनेने मात्र अतिशय त्वरेने हालचाली करीत भाजपच्या उमेदवारीच्या दावेदार शुभांगी पाटील यांना हायजॅक करीत पाठींबा जाहीर केला. अमरावतीत काँग्रेसला उमेदवार नसल्याने त्यांनी शिवसेनेचे लिंगाडे यांना पाठींबा दिला. त्यामुळे पर्यायच नसल्याने हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे झाले. यात जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपकडे तीन तीन इच्छुक असताना त्यांनी उमेदवारच दिला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपला निवडणूक लढविण्यापेक्षा काँग्रेसचे घर फोडण्यात रस होता. त्यात ते यशस्वी झाले, मात्र मतदारांना हे पटलेले नाही. कालपर्यंत तांबे यांच्याबरोबर असलेले अनेक मतदार आज गोंधळलेले आहेत. तांबे यांना मतदान म्हणजे कोणत्या पक्षाला, कोणत्या विचारधारेला मतदान याचा गोंधळ कायम आहे. हेच महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पत्थ्यावर पडले आहे.

निवडणुकीला सुरवातीला राजकीय उलथापालथीचा रंग दिला गेला. मात्र जसे जसे ते चित्र वाढत गेले, शिवसेना अधिक सावध झाली. या निवडणुकीत सर्वाधीक मतदार नगर तर त्या खालोखाल नाशिकला आहेत. नगरमध्ये भाजपचा संदेश काहीही असला तरीही तांबे यांना सावध करणारी विधाने विखे पाटील देत आले आहेत. काँग्रेस पक्षातील मोठा गट व शिक्षकाच्या संघटना तांबे यांच्या पाठीशी आहेत. नगरच्या जिल्हा अध्यक्षांनी या विषयावरून राजीनामा दिला आहे. मात्र शिक्षक मतदार त्याला अनुसरून भूमिका घेतील असे नाही.

महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यासाठी काँग्रेसने हातचे राखूनच काम केले आहे. मात्र तसाही या पक्षाची ताकद किती हे जोखावे लागेल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात आहे. त्याहीपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलेला भाजपचा प्रयोग मतदारांना नको आहे. त्यातून शुभांगी पाटील यांना मतदारांची सहानुभूती मिळत असल्याचे चित्र आहे. ही सहानुभूती त्यांना विजयाकडे नेण्यास पुरेशी आहे का ? हे मतदार मतपेटीतून उद्या व्यक्त होतील. बाकी स्वराज्य संघटनेसह अन्य चौदा उमेदवार मतपत्रिकेवर आहेत. त्यांच्याबद्दल मतमोजणीनंतरच कळेल.

राज्यात पाच मतदारसंघात निवडणुका होत आहेत. त्यात सत्ताधारी शिंदे गट कुठेही नाही. भाजप काठावर बसून आनंद घेत आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक भविष्यातील चित्र व धोरण काय हे सांगणारी असेल. त्यांच्यासाठी एका नव्या लढ्याची आणि अस्तित्वाची लढाई असेल. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध अंगांनी त्यामुळेच चर्चिली गेली. राजकारणात टाईमींगला खुप महत्त्व असते. ते अचुक टाईमींग शुभांगी पाटील यांनी साधले आहे. त्याचा लाभ त्यांना होताना दिसतोय. मोठी यंत्रणा नसताना चर्चेत राहण्यात त्या यशस्वी ठरल्या. अनेक यंत्रणा व मतदार त्यांच्यासाठी अदृष्य राहून, कोणतिही अपेक्षा न ठेवता कार्यरत आहेत. तेच त्यांचे मतमोजणीआधीचे मोठे यश म्हणावे लागेल. या निवडणुकीत कोणीही शंभर टक्के थेट मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीकडे गेलेल्या शुभांगी पाटील आणि नाशिकची निवडणूक राज्यात सर्वाधिक चर्चेची बनली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com