एसटीवर दगड भिरकवणारा कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

(Leaders in the government are trying to end the ST strike.) नेरी जवळील गाडेगाव घाटात एका आयशर मागे लपून बसलेल्या उमेश आवटी नावाचा जामनेर आगारातील वाहकानेच बस समोर येताच काचेवर दगड भिरकावला.
Bus
BusSarkarnama

जळगांव ः राज्यात सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता दोन आठवडे उलटले तरी संपत नाहीये. सरकारने समाधानकारक पगारवाढ देऊ केली तरी कर्मचारी ऐकायला तयार नाहीत. एसटीचे शासनामध्ये विलनीकरण करा, या मागणीवर ते ठाम आहेत. त्यामुळे हा संप अजूनही सुरूच आहे.

सरकारने खाजगी वाहनांना प्रवासी वाहतूकीच परवानगी दिली असली तरी ही यंत्रणा तोडकी पडते. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब व राज्य सरकारमधील नेते हे एसटीचा संप मिटावा यासाठी प्रयत्न करत आहे. कधी निलंबनाची कारवाई, तर कधी पगार वाढीचा निर्णय मागे घेण्याचा इशारा असे सगळे प्रकार केले जात आहेत.

पण एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यातून ज्या एसटीची घंटी निश्चित ठिकाण आल्यावर वाजवत कंडक्टर प्रवाशांना विश्वासाने सुरक्षित आपल्या गावाला पोहचवणारे हेच हात आपल्याच लालपरीवर दगड भिरकावत आहेत. असा प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडला आहे.

एसटीवर दगड भिरकावणाऱ्या कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगाव आगाराची पहिली बस क्रमांक. एमएच-२० बीएल-३४५१ जामनेर येथे रवाना करण्यात आली होती.

जामनेर येथून दुपारी दोन वाजता परतीचा प्रवास करत असताना नेरी जवळील गाडेगाव घाटात एका आयशर मागे लपून बसलेल्या उमेश आवटी नावाचा जामनेर आगारातील वाहकानेच बस समोर येताच काचेवर दगड भिरकावला.

एसटी बस चालक सोपान सपकाळे चालक क्रमांक १३५८ यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने पुढील मुख्य काच थोडक्यात बचावली. या प्रकारामुळे बसमधील उपस्थित प्रवाशांमध्ये मात्र घबराट निर्माण झाली होती. बसमधील साध्या वेशात बसलेल्या पोलिसांनी ताबडतोब बसमधून बाहेर पडत संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला.

Bus
मी पाटील; कुणाला घाबरणार नाही : चंद्रकांतदादा

एका शेतात या वाहकाला ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील यावेळी हजर होते. सोशल मीडियावरील पोस्ट वाचून भावनेच्या भरात हे कृत्य घडल्याचे दगड भिरकावणाऱ्या वाहकाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com