आयुक्त विद्या गायकवाड यांनी रस्त्यावर उतरून केली पेव्हर ब्लॉकची तपासणी!

जळगाव शहरातील पेव्हर ब्लॉक कामाची गुणवत्ता तपासणी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केली.
Commissioner Vidya Gaikwad
Commissioner Vidya GaikwadSarkarnama

जळगाव : शहरात (Jalgaon) काही भागात पेवर ब्लॉकच्या कामाच्या गुणवत्तेची जागेवर जाऊन महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Vidya Gaikwad) यांनी पाहणी केली. यावेळी गायकवाड यांनी पेव्हर ब्लॉक बसविण्याची तांत्रीक पध्दती व प्रत्यक्ष झालेले कामकाज याची तपासणी केल्याने कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. (Commissioner Vidya Gaikwad visit pever block site for Quality testing)

Commissioner Vidya Gaikwad
रशीद शेख म्हणाले, आयुक्त जुम्मा के जुम्मा काम करतात!

येथील महापालिकेने नुकतेच काँक्रीट टेस्टिंगसाठी टेस्टिंग हॅमर हे उपकरण खरेदी केले आहे. त्याद्वारे काँक्रिट टेस्टिंगची गुणवत्ता तपासणी मक्तेदाराने महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेल्या देयकानुसार करण्यात येत आहे. त्यानुसार सर्वे क्रमांक ११८, गणपती मंदिराच्या खुल्या जागेत केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाची, तसेच पिंपळा येथील गट क्रमांक ५,१/२ अष्टभुजानगरमधील ओपन स्पेसमध्ये केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाची गुणवत्ता तपासणी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केली. या वेळी त्यांच्यासमवेत शहर अभियंता नरेंद्र जावळे, संबंधित मक्तेदार, प्रतिनिधी उपस्थित होते.

Commissioner Vidya Gaikwad
राज ठाकरेंनी कौतुक केलेले सलीम शेख बाद, शिवसेनेची मात्र चंगळ!

या वेळी आयुक्त विद्या गायकवाड यांनी संबंधित शाखा अभियंता, मक्तेदार यांना कामासंबंधी कोणत्याही प्रकारची तडजोड कामात केली जाणार नाही, कामाची क्वालिटी व गुणवत्ताही वर्कऑर्डरमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे करावी लागेल, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com