आदेश धुडकावले, भूमाफियांकडून २४ तास आरएमसी सुरूच

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खननातील चुकीचे काम उघडकीस आले आहे.
RMC project File Photograph
RMC project File PhotographSarkarnama

नाशिक : जिल्ह्यात (Nashik) मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या गौणखनिज (secondary minerals) उत्खननातील चुकीचे प्रकार उघडकीस येताच जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) ही कामे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यास अवघे काही दिवस होत नाही तोच सारूळमध्ये मोठ्या प्रमाणात `आरएमसी`चे काम बिनधास्तपणे २४ तास सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही कामे कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे, याबाबतची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. (secondary minerals excavation still on in Nashik after collector`s closure order)

RMC project File Photograph
Bihar Politics : 'नितीशकुमार पुन्हा भाजप सोबत जाणार!'

गत १४ सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक तालुक्यातील सारुळ येथील सर्व क्रशरसाठी लागणाऱ्या दगड खदानीचे उत्खनन बंद केले आहे. या कारवाईला आता दीड महिना झाला आहे. उत्खनन बंद असताना `आरएमसी`साठी लागणारी वॉश सॅन्ड आणि खडी कुठून उपलब्ध होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरएमसीमध्ये ८० टक्के क्रशर मटेरिअल वापरले जाते. या मटेरियलचे खदानीतून उत्खनन बंद आहे. सारुळची रॉयल्टी बंद आहे. तर मग `आरएमसी`चे काम २४ तास रात्रंदिवस कसे काय सुरु आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामागे नेमका कोणाचा हात आहे? याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होणे आवश्यक असल्याचे मत सुजाण नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करत आहेत.

RMC project File Photograph
Uddhav Thackeray : ठाकरेंचे टेन्शन वाढले? न्यायालयात याचिका दाखल करत वकील महिलेचे गंभीर आरोप

चोरीछुपे पद्धतीने उत्खनन

`आरएमसी` करता दगडाची गरज भासते. परंतु सध्या गौण खनिज उत्खनन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पूर्णत: बंद आहे. असे असतानाही सारुळमध्ये आरएमसीचे काम रात्रंदिवस सुरू आहे. मग त्यासाठी लागणारा दगड हा नेमका येतो तरी कुठून? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे चोरीछुपे पद्धतीने आजही गौण खनिज उत्खननाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा मोठा पुरावा सारुळमध्ये सुरू असलेल्या कामावरून दिसून येतो.

बिनधास्तपणे आरएमसी सुरू कसे?

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हाभरातील सर्व गौण खनिज उत्खननाचे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र त्यांचा आदेश धुडकावत काही विशिष्ट लॉबीकडून बिनधास्तपणे आरएमसीचे काम मोठ्या प्रमाणात सारुळ येथे सुरू आहे. जर कच्च्चा माल उपलब्ध नाही तर मग त्यावर अवलंबून असलेले आरएमसीचे काम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? याचा शोध घेऊन त्यावर कारवाई झाली पाहिजे.

- अजिंक्य चुंभळे, सरपंच, गौळाणे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in