जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, `मी सर्व ठिकाणी मास्क घालतो`

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना ऑनलाइन आढावा बैठकीत हा निर्णय झाला.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, `मी सर्व ठिकाणी मास्क घालतो`
Guardian Minister Chhagan Bhujbal & Collector Suraj MandhareSarkarnama

नाशिक : काल जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत कोरोना विषयक (Covid19) आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बैठकीतच मास्क काढून ठेवला. यापुढे आपण मास्क वापरणार नाही, असे सांगितल्याच्या बातम्या आल्या. मात्र मी अत्यंत काळजीपूर्वक सर्व ठिकाणी मास्क घालतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Guardian Minister Chhagan Bhujbal & Collector Suraj Mandhare
गिरीश महाजनांच्या सहकाऱ्यालाही अटकेपासून संरक्षण!

सुरज मांढरे गेले दोन वर्षे जिल्ह्यात कोरोन काळात विविध उपाययोजना करीत आहेत. मालेगावला देशातील सर्वाधिककोरोना संसर्ग गतवर्षी झाला होता. त्यावर देखील प्रशासनाने नियंत्रण प्रस्थापित केले. त्यामुळे श्री. मांढरे याबाबत शाश्त्रीय उपाययोजनांबाबत जागरूक असतात. ते म्हणाले, `मी मीस्क घालणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे काय` अशी विचारणा होत आहे. असे विचारण्याबाबत कारण समजत नाही. या बातमीचे उगम स्थान काय आहे हे मला ज्ञात नाही. हे वार्तांकन करताना माझ्याकडून कोणीही खातरजमा केलेली नाही. असा कोणताही निर्णय मी कधीही घेतलेला नाही. उलटपक्षी मी अत्यंत काळजीपूर्वक सर्व ठिकाणी मास्क घालत आहे हे सर्वानाच ज्ञात आहे. कोविड त्रीसूत्रीचे योग्य पालन करणे आणि लसीकरण करून घेणे हाच कोरोनापासून वाचण्याचा योग्य उपाय आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Guardian Minister Chhagan Bhujbal & Collector Suraj Mandhare
शिवसेना, भाजपच्या वादात छगन भुजबळ काढणार तोडगा!

दोन आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने प्रवेशद्वार नसलेल्या उघड्यावरील पर्यटन स्थळांवर जिल्ह्यात बंदी घालण्याचा तसेच, रामकुंडासारख्या धार्मिक तिर्थस्थळांवर शिस्तीचे पालनासाठी अधिक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आजच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला.

दिवसागणिक कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. त्यामुळे नाशिक शहर जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंधांबाबत फेरविचार करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते. अनेक अधिकारी ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.

श्री भुजबळ म्हणाले की, दोन आठवड्यापासून शहर- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिवसाला हजार ते दीड हजाराच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. नाशिक शहर, निफाड, दिंडोरी तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र होमक्‍वारंटाईन राहूनच रुग्ण बरे होत आहे ही समाधानाची बाब आहे. निफाड, दिंडोरीसह नाशिक शहरात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या व्‍यक्तीबाबत अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मॉर्निंग वॉक सुरुच

ते म्हणाले की, प्रवेशद्वाराची सोय असलेल्या पर्यटनांची ठिकाण यापूर्वीच बंद केली आहे. मात्र उघड्यावरील गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्याची गरज आहे. त्यामुळे धऱणासह उघड्यावरील पर्यटन स्थळ बंद केली जाणार आहे. नाशिकला रामकुंड हे देशातील धार्मिक तिर्थक्षेत्र असून तेथे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तेथे पोलिस व महापालिका यंत्रणेने एकत्रितपणे उपाययोजना करून विधिंना प्रतिबंध न करता तेथील नियम अधिक काटेकोरपणे राबवावेत अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

‘मालेगाव मॅजिक चे सूत्र

पहिल्या लाटेत देशभरात मालेगावला रुग्णसंख्या लक्षणीय होती त्या मालेगाव भागात कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. मात्र त्याच मालेगाव भागात सध्या जेमतेम १३८ रुग्ण आहेत. यामागे तेथे हर्ड इम्युनिटी (ॲटी बॉडी) विकसित झाली का, याचा अभ्यास सुरू आहे. ‘मालेगाव मॅजिकचे सूत्र' शोधण्याचे काम सुरु असल्याचे श्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in