जिल्हाधिकारी, सीईओ यांची अंगणवाडीत ‘डब्बा पार्टी’

पोषण माहनिमित्त कुंडाणे येथे अंगणवाडीत ‘डब्बा पार्टी’; गरोदर, स्तनदा मातांना मार्गदर्शन
Collector & Officers having lunch at Anganwadi
Collector & Officers having lunch at AnganwadiSarkarnama

धुळे : राष्ट्रीय (National) पोषण माहनिमित्त मंगळवारी कुंडाणे- वार (ता. धुळे) येथील अंगणवाडी केंद्रात (Aanganwadi) जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती धरती देवरे, (Dharti Devre) जिल्हाधिकारी जलज शर्मा, (Jalaj Sharma)जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस. (S. Bhuvaneshwari) यांनी ‘डब्बा पार्टी’ केली. या उपक्रमात सहभाग नोंदवत त्यांनी सहभोजन केल्याने पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. (Collector`s kunch in Anganwadi appriciate by locals)

Collector & Officers having lunch at Anganwadi
NCP News: देश विकायला भाजपला बारामतीची जागा हवी आहे का?

राष्ट्रीय पोषण माहनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. धुळे जिल्हा परिषदेतर्फे ‘डब्बा पार्टी’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. मंगळवारी कुंडाणे (वार) येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील अंगणवाडी क्रमांक-१ येथे हा उपक्रम घेण्यात आला.

Collector & Officers having lunch at Anganwadi
Co-operative : थकबाकीदारांच्या नातेवाईकांच्या ठेवीतून कर्जवसुली

गरोदरपणात घ्यावयाची काळजी, लसीकरण, चांगल्या आरोग्य सवयी तसेच उत्तम पोषणाच्या दृष्टीने योग्य आहाराबाबत मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम झाला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती देवरे, जिल्हाधिकारी श्री. शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, सरपंच दादाजी मोरे, उपसरपंच जी. जी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गरोदर व स्तनदा माता व त्यांचे कुटुंबीय या उपक्रमात सहभागी झाले. सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतः डबा आणून येथे सहभोजनाचा आनंद घेतला.

विभागाच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविताना विशेष आनंद झाल्याचे सभापती श्रीमती देवरे याप्रसंगी म्हणाल्या. गरोदरपणात आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आहाराकडे दुर्लक्ष केल्यास कुपोषणाला आमंत्रण मिळते. त्यामुळे सुयोग्य पोषण गरजेचे असल्याचे भुवनेश्‍वरी एस. यांनी सांगितले. बालकाचे आरोग्य ही केवळ मातेची जबाबदारी नाही तर पित्याची देखील आहे असे जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले.

बाळ जन्मल्यापासून सुरवातीचे एक हजार दिवस योग्य पोषण दिल्यास कुपोषणाला निश्चितच आळा बसतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्यात गरोदर कालावधीत मातेची घेतलेली काळजी विशेष महत्त्वाची भूमिका बजावते. महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com