अंधेरी रातोमे एक मसीहा निकलता है...वाळू माफीया धास्तावले!

जिल्ह्याधिकारी सलग दुसऱ्या दिवशी नदीपात्रात पोहोचल्याने वाळूमाफियांचे धाबे धणाणले.
Collector Aman Mittal
Collector Aman MittalSarkarnama

जळगाव : जिल्हाधिकारी (Collector) अमन मित्तल (Aman Mittal) यांनी अवैध वाळू उपशा (Illegle sand collection) करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात उठविलेले रान सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४)ही सुरूच होते. मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान श्री. मित्तल, तहसीलदार नामदेव पाटील यांनी खेडी, आव्हाणे परिसरात रात्री एक ते तीनदरम्यान ही मोहीम राबविली. (Officers take action in midnight) या कारवाईत दोन डंपर जप्त केले. यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा धसका वाळूमाफियांनी घेतला आहे. (Illegal sand mafia in Jalgaon disturb due to Collectors action)

Collector Aman Mittal
गुलाबराव पाटील यांवी ठाकरे गटाचा धसका घेतला?

गेल्या बुधवारी पहाटे जिल्हाधिकारी मित्तल यांनी वाळू चोरणाऱ्या व त्यांच्या वाहनाभोवती संशयास्पद फिरणाऱ्या तब्बल सात जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील काही जणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क पाठलाग केला होता. मात्र, निमखेडीतील गल्ली बोळाचा फायदा घेत काहीजण पळून गेले होते. मात्र, सात जणांना पकडण्यात त्याच्या पथकाला यश आले होते. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती.

Collector Aman Mittal
राहुल गांधींच्या यात्रेबाबत मोठी बातमी, राज्यातील १६ किमीचा टप्पा चार चाकीतून पार करणार; कारण...

शुक्रवारी पहाटे आव्हाणे, खेडी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, महसूल कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातील मध्यरात्री बॅटरीच्या प्रकाशात संभाव्य वाळू चोरीच्या ठिकाणावर पाहणी केली. नदीपात्रात कोणी वाहने टाकून वाळू काढत आहे का, याची शहानिशा केली. दोन डंपर पकडण्यात आले. त्यातील एक डंपर (जीजे २१- ७४२४) व दुसरा विना क्रमांकाचा होता. वाहने पकडताच डंपरच्या वाहनचालकांनी पळ काढला. दोन्ही वाहने तालुका पोलिस ठाण्यात जमा करून पंचनामा करण्यात आला. सोबत वाहनमालकांवर गुन्हा नोंदविणे, विनाक्रमांकाच्या वाहनाच्या मालकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

असोदा मंडलाधिकारी रमेश वंजारी , म्हसावद मंडलाधिकारी अजिंक्य आंधळे, चिंचोलीचे तलाठी सुधाकर पाटील, कानळदा तलाठी ज्ञानेश्वर माळी, ममुराबाद तलाठी विरेंद्र पालवे, वाहनचालक सचिन मोहिते, मनोज कोळी, सुरक्षारक्षक शिंदे, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाइ केली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in