Suhas Kande News; मुख्यमंत्री शिंदे करणार ३११ कोटींच्या पाणी योजनेचे भूमिपूजन!

करंजवन पाणीपुरवठा योजनेचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार भूमिपूजन
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeSarkarnama

नाशिक : (Nashik) गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मनमाडचा (Manmad) पाणीप्रश्न (Water supply schme) अखेर मिटणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ३११ कोटींच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) करंजवन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि एमआयडीसीची घोषणा होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. (Will CM Eknath Shinde make announcement of Manmad MIDC)

MLA Suhas Kande
Satyajit Tambe News; सत्यजित तांबेंचा विजय, भाजपसाठी धडा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात ते मनमाडसाठी औद्योगिक वसाहतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने नांदगाव मतदारसंघासाठी दोन महत्त्वाच्या योजनांची घोषणा होणार असल्याने त्याची चर्चा आहे.

MLA Suhas Kande
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरेंना फोन ; म्हणाले..

आमदार कांदे म्हणाले, की चाळीस वर्षांपासून शहराचा पाणीप्रश्न रखडलेला होता. अनेकांनी प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. नांदगांव तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी असल्याने मी मनमाड शहराचा पाणीप्रश्न मिटावा यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले आहे. मनमाडसाठी जीवनदायिनी असलेली करंजवन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जात आहे. येथील महर्षी वाल्मीकी क्रीडा संकुलावर त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ऐतिहासिक योजनेचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, खा. डॉ श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com