Jalgaon News: `खोके, ओक्के`च्या घोषणा मुख्यमंत्री शिंदे समर्थकांना झोंबल्या?

शिंदे समर्थक म्हणतात, मुख्यमंत्री शिंदे यांनी निधी दिला, तुम्ही काय केले?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जळगावसाठी (Jalgaon) मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, मात्र महापालिकेत (Jalgaon Municiple Corporation) सत्तेवर असलेल्या शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने कोणतीही कामे केली नाहीत, मुख्यमंत्र्यांविरोधात चुकीच्या घोषणा देवून ते आंदोलन करीत आहेत. याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत, अशी माहिती शिंदे गटातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. (Eknath Shinde supporters will file fir against Shivsena Workrs)

Eknath Shinde
आमदार सांगतात, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`

अजिंठा विश्रामगृहात शिंदे गटातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नीलेश पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मनोज चौधरी, गजानन देशमुख महिला आघाडीच्या शोभा चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरूध्द शिवसेनेतर्फे गाजर दाखवा, आंदोलन करण्यात आले होते.

Eknath Shinde
BJP News: भाजपचे प्रदीप कर्पे म्हणतात, `महापौरांचे स्थान द्यावे`

याबाबत त्यांनी म्हटले होते, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव दौरा केला मात्र त्यांनी जळगाव जिल्ह्याला ठोस काहीही दिले नाही, केवळ गाजर दाखविले असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना नीलेश पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगरला एमआयडीसीची महत्वपूर्ण घोषणा केली तसेच केळीवर पडणाऱ्या सीव्हीसी रोगाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरुद्ध आंदोलन करून जनतेत गैरसमज पसरविणे योग्य नाही, तसेच मुख्यमंत्र्यांविरूध्द ज्या घोषणा दिल्या त्या चुकीच्या होत्या. त्याबाबत आपण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत, अशी माहिती देण्यात आली.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मनोज चौधरी म्हणाले, की एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना व आता मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी जळगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. ६१ कोटी रूपयाचा निधी दिला असून त्यातून महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांनी कोणतीही कामे केलेली नाहीत. आता मुख्यमंत्री झाल्यावर ११ कोटी २५ लाख रूपयांचा निधी दिला आहे, यातून केवळ दोन कोटी रूपयांची कामे झाली आहेत.

अद्याप कोणत्याही भागात कामे सुरू करण्यात आलेली नाही. निधीचे नियोजनसुध्दा त्यांच्याकडून केले जात नाही. तब्बल दोन-दोन महिने महासभा घेतली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

आम्ही सध्या बोलणार नाही : महापौर

शिंदे गटातर्फे करण्यात आलेल्या आरोपांबाबत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की या आरोपांवर आम्हाला कोणतेही उत्तर द्यायचे नाही, यावर आम्ही सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com